Wanindu Hasaranga was reprimanded by the ICC after hitting the bat on the boundary: श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा याला शुक्रवारी नेदरलँड्सविरुद्धच्या क्रिकेट विश्वचषक पात्रता सामन्यादरम्यान आयसीसी आचारसंहितेच्या पातळी एकचे उल्लंघन केल्याबद्दल फटकारण्यात आले आहे. आयसीसीने सांगितले की, हसरंगाने बाद झाल्यानंतर अनावश्यक आक्रमकता दाखवली आणि आपली बॅट सीमारेषेवर आपटली. या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेणार्या श्रीलंकेने चूक मान्य केली. यासोबतच त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंटही जमा झाला आहे.
निवेदनात म्हटले आहे की हसरंगा हे क्रिकेट उपकरणे किंवा कपडे, मैदानावरील उपकरणे यांच्याशी संबंधित असलेल्या आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२ चे उल्लंघन केल्याचे आढळले. हसरंगाने आपली चूक मान्य केल्याने याप्रकरणी पुढील सुनावणीची गरज पडली नाही. २४ महिन्यांत पुन्हा असे झाल्यास, वानिंदू हसरंगाच्या खात्यात आणखी एक डिमेरिट पॉइंट जोडला जाईल. अशा परिस्थितीत डिमेरिट पॉइंटची संख्या आता २ झाली आहे.
पातळी एकचे उल्लंघन केल्यास ५० टक्के मॅच फी कापली जाऊ शकते –
मैदानी पंच मार्टिन सॅगर्स आणि ग्रेग ब्रॅथवेट, तिसरे पंच जयरामन मदनगोपाल आणि चौथे पंच आसिफ याकूब यांनी वानिंदू हसरंगावर आरोप लावले. लेव्हल एकच्या उल्लंघनास किमान अधिकृत फटकार आणि खेळाडूच्या मॅच फीच्या २० टक्के दंड अशी तरतूद आहे. त्याचबरोबर एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट्सही दिले जातात.
हेही वाचा – VIDEO: मिचेल स्टार्कने घेतलेल्या झेलवरून निर्माण झाला वाद, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
सुपर सिक्समध्ये श्रीलंका अव्वल –
एकदिवसीय विश्वचषक पात्रता फेरीत नेदरलँड्सवर विजय मिळवल्यानंतर श्रीलंका सध्या सुपर सिक्समध्ये अव्वल स्थानावर आहे. तो एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरणार हे निश्चित आहे. वेस्ट इंडिजचा संघ भारतासाठी तिकीट मिळविण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. झिम्बाब्वेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. वानिंदू हसरंगाने आतापर्यंत पाच सामन्यात २० विकेट घेतल्या आहेत. त्याने तीन सामन्यात पाच बळी घेतले आहेत.