सचिन तेंडुलकर या आठ शब्दांत सामावलेले आश्चर्य मुंबईत घडले. वांद्रे येथील साहित्य सहवास मधून सुरू झालेला प्रवास १८ नोव्हेंबरला मुंबईतीलच वानखेडे स्टेडियमवर संपणार आहे. क्रिकेटचा राजदूत अशी बिरूदावली प्राप्त झालेल्या सचिनला शेवटचं मैदानावर प्रत्यक्ष पाहण्याची संधी त्याच्या २००व्या आणि शेवटच्या कसोटीच्या निमित्ताने मिळणार आहे. मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न जिमखाना आणि क्लब्सना तिकीटांचा नजराणा देत असल्याने ३३,००० क्षमतेच्या वानखेडे मैदानावर केवळ ५,००० तिकीटे सामान्य प्रेक्षकांसाठी उपलब्ध असणार आहेत. १०,०० रुपयांची दीड हजार विशेष तिकीटांचा विचार करता ४५०० ते ५००० प्रेक्षकांसाठी तिकीटे सामान्य प्रेक्षकांसाठी उपलब्ध असतील असे एमसीएचे खजिनदार विनोद देशपांडे यांनी सांगितले. ही तिकीटे ऑनलाइन उपलब्ध असतील का मैदानावरील तिकीट विक्री केंद्रावर याबाबत एमसीएने निर्णय घेतलेला नाही.

Story img Loader