Wankhede Stadium A Glorious Heritage of Cricket : मुंबईतील वानखेडे स्टेडियमला क्रिकेटची पंढरी म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण या स्टेडियमवर खेळून अनेक भारतीय क्रिकेट दिग्गजांनी जागतिक पातळवीर आपली छाप सोडली आहे. त्यापैक सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे सचिन तेंडुलकर. ज्याला मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव यांसारख्या नावाने ओळखले जाते. सचिनच्या नावाशिवाय भारताच्या क्रिकेटची व्याख्याच पूर्ण होऊ शकत नाही. अशा या क्रिकेटच्या पंढरीला म्हणजे मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमला यंदा १९ जानेवारी २०२५ मध्ये ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. पण क्रिकेटचा अद्भुत वारसा असणारे वानखेडे स्टेडियम का खास आहे? ते आज आपण जाणून घेऊया.
वानखेडे स्टेडियम हे जगातील सर्वात प्रतिष्ठित क्रिकेट स्टेडियमपैकी एक आहे. भारतातील मुंबई शहराच्या मध्यभागी असलेल्या या स्टेडियमने इतिहासातील काही अविस्मरणीय क्रिकेट सामने आयोजित केले आहेत, ज्यात १९८३ क्रिकेट विश्वचषक फायनल, २०११ क्रिकेट विश्वचषक फायनल आणि २०१३ इंडियन प्रीमियर लीग फायनल यांचा समावेश आहे. हे स्टेडियम मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) च्या मालकीचे असून मुंबई, आणि मुंबई इंडियन्सचे होम ग्राउंड आहे. त्याची क्षमता ३३,००६ आहे आणि हे भारतातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमपैकी एक आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बॅरिस्टर शेषराव कृष्णराव वानखेडे यांच्या नावावरून वानखेडे स्टेडियमचे नाव देण्यात आले आहे. हे स्टेडियम १३ महिन्यांत बांधले गेले आणि १९७५ मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेच्या अंतिम सामना या स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेला पहिला सामना होता. या वानखेडे स्टेडियमने इतिहासातील काही सर्वात नेत्रदीपक क्रिकेट सामने आयोजित केले आहेत. त्यापैकी काही जाणून घेऊया.
हेही वाचा – N Jagadeesan : ६ चेंडू, ६ चौकार… एन.जगदीशनचा अनोखा विक्रम, VIDEO होतोय व्हायरल
वानखेडे स्टेडियमवरील काही खास सामने –
- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, १७ ऑक्टोबर, १९८७ – भारताचा आठ विकेट्सने शानदार विजय.
- भारत विरुद्ध इंग्लंड, ५ नोव्हेंबर १९८७ – इंग्लंडचा ३५ धावांनी रोमांचक विजय.
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २७ फेब्रुवारी १९९६ – ऑस्ट्रेलिया १६ धावांनी जिंकला.
- न्यूझीलंड विरुद्ध कॅनडा, १३ मार्च २०११ – न्यूझीलंडचा ९७ धावांनी शानदार विजय.
- श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड, १८ मार्च २०११ – श्रीलंका ११२ धावांनी विजयी.
- भारत विरुद्ध श्रीलंका, २०११ विश्वचषक फायनल, २ एप्रिल, -भारताने सहा विकेट्सने विजय मिळवत दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरले.
काय आहे वानखेडे स्टेडियमचे वैशिष्ट्य?
- वानखेडे स्टेडियम हे टेफ्लॉन फायबरच्या छताने उष्णतेला प्रतिरोधक आहे आणि वजनाने हलके आहे.
- उत्तर आणि दक्षिण स्टँडमध्ये २० लिफ्ट आहेत.
- वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी लाल मातीची आहे.
- हे स्टेडियम २० एकरात पसरले आहे.
- २०११ आयसीसी विश्वचषक फायनल येथे खेळली गेली होती, ज्यामध्ये भारताने २८ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक जिंकला.
- हे बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ), एमसीए आणि आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) चे मुख्यालय म्हणून काम करते.
- वानखेडे स्टेडियममध्ये प्रेक्षक बसण्याच्या क्षमता आता ३३,१०८ आहे. पूर्वी येथील क्षमता ४५,००० होती.
- वानखेडे स्टेडियमचे नाव राजकारणी शेषराव कृष्णराव वानखेडे यांच्या नावावर आहे, जे एक उत्कृष्ट क्रिकेट व्यवस्थापक देखील होते.
- या मैदानावर रवी शास्त्री यांनी सलग ६ चेंडूत ६ षटकार मारले होते. त्यांनी बडोद्याचे गोलंदाज तिलक राज यांच्या षटकात हा पराक्रम केला आहे. त्यांनी १९८५ मध्ये सर्वात वेगवान द्विशतक झळकावले होते.
- समुद्राच्या जवळ असल्यामुळे या मैदानाची खेळपट्टी वेळोवेळी बदलत राहते. जे कधी फिरकीसाठी तर कधी स्विंग गोलंदाजांना मदत करते.