Wankhede Stadium Mumbai Ajaz Patel 10 Wickets Record : मुंबईकर क्रिकेट रसिकांसाठी वानखेडे स्टेडियम ही तर मुंबई क्रिकेटची पंढरी. यंदा वानखेडे स्टेडियम आपली पन्नाशी साजरी करतोय. वानखेडे स्टेडियम हा क्रिकेटच्या अनेक पराक्रमांचा साक्षीदार आहे. २०११ सालचा भारताचा वर्ल्ड कप विजय तसेच सचिन तेंडुलकरची द्विशतकी कसोटी आणि निवृत्ती, मुंबई संघाचे रणजी ट्रॉफीतील ४२ वे जेतेपदाचे साक्षीदार आहे. यासह हे स्टेडियम भारतीयांबरोबर परदेशातील खेळाडूंच्या विक्रमांचे साक्षीदार राहिले. त्यामुळे आज आपण अशांपैकी एक असलेल्या न्यूझीलंडच्या एजाज पटेलच्या खास विक्रमांबद्दल जाणून घेणार आहोत.
एजाज पटेल वानखेडे स्टेडियमवर एका १० विकेट्स घेणारा एकमेव गोलंदाज –
२०२१ मध्ये, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामना मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या कसोटीत एजाज पटेलने इतिहास घडवला होता. एका डावात सर्व १० विकेट्स घेणारा तो केवळ तिसरा खेळाडू आहे. त्याने भारतीय संघाविरुद्ध एका डावात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. विशेष म्हणजे तो वानखेडे स्टेडियमवर एका डावात १० विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज आहे. हा पराक्रम पहिल्यांदा इंग्लंडच्या जेम्स लेकरने १९५६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला होता. यानंतर १९९९ मध्ये भारताच्या अनिल कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध एका डावात १० विकेट्स घेतल्या होत्या.
वानखेडे स्टेडियमवर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा परदेशी गोलंदाज –
इतकेच नाही तर त्याने वानखेडे स्टेडियमवर आणखी खास पराक्रम केला आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात एजाज पटेलने चौथी विकेट घेताच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याच्या नावावर २३ विकेट्सची नोंद केली होती. वानखेडेवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याने मोठी कामगिरी केली आहे. रतील कोणत्याही एका ठिकाणी सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या विदेशी गोलंदाजांच्या यादीत एजाज पटेल पहिला पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत अनेक दिग्गज गोलंदाजांचा समावेश आहे. त्याने इयान बोथमचा विक्रम मोडला आहे. इयान बोथमने वानखेडे स्टेडियमवर २२ कसोटी विकेट घेतल्या होत्या.
भारतीय भूमीवर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे विदेशी गोलंदाज –
२५ – एजाज पटेल, मुंबई (वानखेडे)
२२ – इयान बोथम, मुंबई (वानखेडे)
१८ – रिची बेनॉड, ईडन गार्डन्स
१७ – कोर्टनी वॉल्श, मुंबई (वानखेडे)
१६ – रिची बेनॉड, नेहरू स्टेडियम, चेन्नई
१६- नॅथन लायन, दिल्ली
हेही वाचा – Ira Jadhav : १५७ चेंडू, ३४६ धावा आणि ४२ चौकार…इरा जाधवने स्मृती मानधनाला मागे टाकत झळकावले विक्रमी त्रिशतक
एजाज पटेलचा वानखेडे स्टेडियमवर कायमच राहिलाय दबदबा –
एजाज पटेलने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नेहमीच चमकदार गोलंदाजी केली आहे. वानखेडे स्टेडियमवर आतपर्यंत फक्त दोन सामने खेळले आहेत. येथील आपल्या पहिल्या सामन्यातील त्याने दोन्ही डावात १४ विकेट्स घेतल्या होत्या. ज्यात त्याने सामन्याच्या दुसऱ्या डावात ११९ धावांत १० विकेट्स घेतल्या होत्या. त्या सामन्याच्या पहिल्या डावात एजाज पटेलनेही शानदार गोलंदाजी करत १०६ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या.