अनेक विश्वविक्रम रचूनही मैदानातील कर्मचाऱ्यांशी सचिन तेंडुलकरने कायम ऋणानुबंध जपले. सामन्याच्या वेळी सचिन आणि मैदानातील या कर्मचाऱ्यांमध्ये कधीच दुरावा नव्हता. मैदानातील या कर्मचाऱ्यांनी दोनशेव्या ऐतिहासिक सामन्याचे औचित्य साधत सचिनचा वानखेडेवर सत्कार केला. सचिननेही हा सत्कार स्वीकारत त्यांच्याशी काही वेळ गप्पाही मारल्या. मैदानातील कर्मचाऱ्यांनी अखेरच्या सामन्यासाठी दिलेल्या शुभेच्छांचा सचिनने स्वीकार केला.

Story img Loader