महान गोलंदाज वकार युनूस आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद या संघाचे गोलंदाजी प्रशिक्षकपद भूषविणार आहेत. वकारने पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षकपद तसेच गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. टॉम मूडी हे सनरायझर्स संघाचे मुख्य प्रशिक्षक असून, कृष्णम्माचारी श्रीकांत या संघाचे सल्लागार आहेत. ८७ कसोटीत युनूस यांच्या नावावर ३७३ विकेट्सची नोंद आहे, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी २६२ सामन्यांत ४१६ विकेट्स मिळवल्या आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघातील डेल स्टेन, इशांत शर्मा, क्लिंट मॅककाय आणि सुदीप त्यागी यांना युनूस यांच्या मार्गदर्शनाची संधी मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waqar to be hyderabads bowling coach in ipl