Australia issues new rules ahead of World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या पूर्वी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या सर्व फलंदाजांना एक नियम अनिवार्य केला आहे. वेगवान गोलंदाज आणि मध्यमगती गोलंदाजांचा सामना करताना नेक गार्ड (मानेची रक्षा करणारे कवच) घालणे अनिवार्य केले आहे. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरसह अनेक कांगारू फलंदाज नेक गार्ड वापरणे टाळत आहेत, परंतु आता नवीन नियमांनुसार प्रत्येकाने ते परिधान करणे आवश्यक आहे.

क्रिकेट डॉट कॉम एयूच्या अहवालानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार १ ऑक्टोबरपासून नेक गार्ड किंवा नेक प्रोटेक्टर घालणे अनिवार्य होईल. जर कोणत्याही फलंदाजाने त्याचा वापर करण्यास टाळले, तर त्याला क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नवीन नियमांनुसार अडचणींचा सामना करावा लागेल. २०२३-२४ च्या हंगामापासून खेळण्याच्या स्थितीत बदल झाल्यामुळे, नेक गार्ड अनिवार्य होतील. हेल्मेटच्या मागील बाजूस नेक प्रोटेक्टर बसवले जाईल किंवा फिक्स केले जाईल.

man arrested with 13 kg of charas and weapons by powai police
मुंबईतून अमलीपदार्थ आणि शस्त्रांचा साठा जप्त; साडेतीन कोटींच्या मुद्देमालासह पवईतून एकाला अटक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
anti-ragging rules, non-compliance of anti-ragging rules, National Medical Commission,
रॅगिंगविरोधी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा वैद्यकीय महाविद्यालयांना इशारा
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Why Siraj Get Heavier Penalty Than Head after Adelaide Controversy
Siraj-Head Fight: मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडपेक्षा ICCने जास्त शिक्षा का ठोठावली? काय आहे नेमकं कारण?
India Bangladesh relations, Foreign Secretary talks
भारत-बांगलादेश संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न, परराष्ट्र सचिवस्तरीय चर्चेत हिंदूंच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेला ऑस्ट्रेलियन संघाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनला फलंदाजी करताना आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या चेंडूला लागला, त्यानंतर त्याला रिटायकर्ड हर्ट व्हावे लागले. दोन्ही संघामध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान ही घटना घडली. त्यानंतरच एका आठवड्यानंतर नेक गार्ड नियम जारी करण्यात आला.

हेही वाचा – IND vs PAK: शादाब खानने रोहित शर्माची विकेट घेत केला मोठा कारनामा, पाकिस्तान संघाकडून मिळाला खास पुरस्कार, पाहा VIDEO

२०१५ मध्ये, ऑस्ट्रेलियाने देशांतर्गत क्रिकेटपटू फिलिप ह्यूजचा चेंडू लागून मृत्यू झाला होता. यानंतर नेक गार्ड घालण्याची शिफारस करण्यास सुरुवात केली होती. मात्र, आतापर्यंत अनेक फलंदाज यापासून बचाव करत आहेत. अशा परिस्थितीत आता ते अनिवार्य करण्यात आल्याने त्यांची आता अवघड जाणार आहे.

हेही वाचा – Virat Kohli: १४ वर्षांपासून भेटीची वाट पाहत असलेल्या चाहत्याचे विराटने स्वप्न केले पूर्ण, पाहा व्हायरल VIDEO

स्टीव्ह स्मिथने नेक गार्ड वापरून सांगितले होते की यामुळे त्याला ‘क्लॉस्ट्रोफोबिक’ वाटले. २०१९ च्या अॅशेसमध्ये इंग्लिश वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या बाउन्सरने स्मिथला खूप वेगाने फटका बसला. स्मिथने नेक गार्डची तुलना एमआरआय स्कॅन मशीनशी केली होती. तो म्हणाले की, “मी त्याची तुलना एमआरआय स्कॅन मशीनमध्ये अडकण्याशी करतो.” याशिवाय, वॉर्नरने २०१६ मध्ये सांगितले होते की, तो घालत नाही आणि घालणार नाही. कारण ते त्याच्या मानेला टोचते, ज्यामुळे त्याचे लक्ष विचलित होते.

Story img Loader