इंग्लंडचा खेळाडू जो रूट याला बारमध्ये केलेल्या मारहाणीचा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला पश्चात्ताप झाला असून त्याने शुक्रवारी जाहीरपणे जनतेची माफी मागितली. ‘भविष्यात पुन्हा अशी घोडचूक करू नकोस,’ असा सल्ला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने त्याला दिला आहे.
‘‘बारमधील घटनेबाबत मीच पूर्णपणे दोषी आहे. पण त्या घटनेचा आता पश्चाताप होत आहे. मी माझे सहकारी, संघातील पदाधिकारी, माझी आणि माझ्या कुटुंबियांची मान शरमेने खाली घातली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेली कारवाई मला मान्य असून मी आता अॅशेस मालिकेकडे लक्ष केंद्रित करणार आहे,’’ असे वॉर्नरने पत्रकार परिषदेत सांगितले. वॉर्नरच्या कृत्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याची चॅम्पियन्स करंडकातून हकालपट्टी केली आहे, याचप्रमाणे अॅशेस मालिकेच्या सराव सामन्यापर्यंत निलंबनाची कारवाई केली आहे.
क्लार्क वॉर्नरला म्हणाला, ‘‘हा आयपीएल किंवा कौंटी क्रिकेटमधील संघ नाही. ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व करताना बेशिस्तपणा करून चालत नाही. त्यामुळे भविष्यात अशा घटना वारंवार घडू नयेत, याची काळजी घे.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा