भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदरला करोनाची लागण झाली आहे. आता तो १९ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर जाऊ शकतो. २२ वर्षीय सुंदर भारतीय एकदिवसीय संघातील इतर खेळाडूंसह बुधवारी (१२ जानेवारी) दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार होता. मात्र आता या दौऱ्यावर जाणे कठीण झाले आहे.
भारतीय वनडे संघाचे खेळाडू सध्या मुंबईतील एका हॉटेलमध्ये आहेत, बुधवारी संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. सुंदरचे प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले होते. इंग्लंड दौऱ्यावर सराव सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तो जवळपास ६ महिने टीम इंडियातून बाहेर होता. यामुळे तो यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएल २०२१ आणि टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्यातूनही बाहेर पडला.
हेही वाचा – भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या कोचला करोनाची लागण; झिम्बाब्वे संघाला बसलाय मोठा धक्का!
एकदिवसीय मालिका
- १९ जानेवारी २०२२ – बोलंड पार्क, पार्ल – दुपारी दोन वाजता
- २१ जानेवारी २०२२ – बोलंड पार्क, पार्ल – दुपारी दोन वाजता
- २३ जानेवारी २०२२ – न्यू लँड्स क्रिकेट ग्राऊंड, केपटाऊन – दुपारी दोन वाजता
एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ –
के. एल. राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, आर. अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज