आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ च्या फायनलमध्ये इंग्लंडकडून पाकिस्तानचा पराभव झाला. त्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून ते पाकिस्तानी संघावर आपला रागही व्यक्त करत आहेत. दरम्यान, एका चाहत्याने शाहीन आफ्रिदीबद्दल असे ट्विट केले, ज्यामुळे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम थेट टीव्हीवरच भडकला. अक्रमने या चाहत्याला जाहीरपणे सांगितले की, तो अक्रमसमोर असता तर त्याला कळले असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चाहत्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ”एक नवाझ शरीफ पळपूटा होता आणि एक शाहीन शाह. शाहीन तू आणखी पाच चेंडू टाकायला हवे होते, पण तू मैदानाबाहेर पळून गेलास. यापेक्षा मोठी इव्हेंट असूच शकत नाही. तुझे प्रेत मैदानावरुन परत आले असते, तर बरे झाले असते. मैदानावर मरणार्‍यांना शहीद म्हटले जाते, निदान पळपूटा म्हटले जात नाही.”

या चाहत्याचे हे ट्विट वाचताना अक्रमचा संयम सुटला आणि म्हणाला, ”मी या माणसाचा प्रश्न घेत आहे, ज्याने हे गैरवर्तन केले आहे, त्याचे नाव आहे सबित रहमान सत्ती. जर तुमच्याकडे लहान-मोठे शिष्टाचार नसेल. तू तुमच्या खेळाडूसोबतही गैरवर्तन करत आहात. लाज नाही, शरम नाही. शाहीन आफ्रिदीबद्दल त्याने काय लिहिलंय ते बघा, मला राग येतोय, मी फक्त विचार करतोय की तू माझ्यासमोर असता.”

हेही वाचा – रोहित शर्माने पंजाबी गायक गॅरी संधूकडे केले दुर्लक्ष, गायकाने लाइव्ह येऊन काढला राग, पाहा व्हिडिओ

अक्रमला राग आल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आफ्रिदी अंतिम सामन्यात आपल्या तिसऱ्या षटकातील फक्त एक चेंडू टाकू शकला होता आणि त्यानंतर दुखापतीमुळे त्याला मैदानावरून परत जावे लागले होते. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात आफ्रिदीने २.१ षटकात १३ धावा देत एक विकेट घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wasim akram angry on fan for his tweet regarding shaheen shah afridi video vbm