India vs Pakistan, World Cup 2023: भारताने विश्वचषक २०२३च्या १२व्या सामन्यात पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव करून भारताने विजयी घौडदौड सुरूच ठेवली आहे. भारतीय संघासमोर पाकिस्तानचा संघ पूर्णपणे असहाय्य दिसत होता. या सामन्यानंतर विराट कोहलीने कर्णधार बाबर आझमला स्वाक्षरी असलेली जर्सी भेट दिली. विराट कोहलीचे औदार्य पाहून सोशल मीडियावर व्हायरल त्याचे कौतुक होत आहे. दुसरीकडे मात्र, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम यावर संतप्त दिसत होता. तो म्हणाला की, “आज बाबरसाठी कोहलीची जर्सी घेण्याचा हा दिवस नव्हता.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकरम एका पाकिस्तानी टेलिव्हिजन चॅनेलवरील पॅनेलचा भाग आहे, ज्यामध्ये तो म्हणाला, “जेव्हा मी तो शर्ट सार्वजनिकपणे घेत असल्याचे चित्र पाहिले, तेव्हा मला खूप वाईट वाटले. हे करण्याचा आजचा दिवस नव्हता. जर तुम्हाला हे करायचे असते आणि तुमच्या काकांच्या मुलाने तुम्हाला कोहलीचा टी-शर्ट आणायला सांगितले असते. तसेच, तुम्ही मॅचनंतर ड्रेसिंग रूममध्ये जाऊन तसे करू शकले असते. हे सार्वजनिक ठिकाणी व्हायला नको होते. पाकिस्तानमधील चाहत्यांच्या भावना तुम्ही समजून घ्यायला हव्या होत्या.”

सामन्यानंतर बाबरने कबूल केले की त्याच्या संघाने खराब कामगिरी केली. पाकिस्तानचे २८०-२९० धावांचे लक्ष्य असताना ते केवळ १९१ धावांपर्यंत मजल मारू शकले. बाबर म्हणाला, “आम्ही चांगली सुरुवात केली. माझ्यात आणि इमाममध्ये चांगली भागीदारी झाली होती. आम्ही अप्रतिम क्रिकेट खेळत होते. अचानक आमची पडझड झाली आणि त्याचा शेवट चांगला झाला नाही. आम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली, आम्हाला २८०-२९० लक्ष्य गाठायचे होते.” सामन्यानंतर तो पुढे म्हणाला, “नवीन चेंडू असूनही आम्ही भारताच्या विकेट्स काढू शकलो नाही. आम्ही पाकिस्तानी चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. रोहित ज्या प्रकारे खेळत आहे, त्याला रोखणे हे आमच्यासमोर एक आव्हान होते, त्याने शानदार खेळी खेळली.”

हेही वाचा: ENG vs AFG, WC: रहमानउल्ला गुरबाजची तुफानी खेळी! नवख्या अफगाणिस्तानने इंग्लंडचा फोडला घाम, विजयासाठी ठेवले २८५ धावांचे आव्हान

भारताने पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये लाखो भारतीय चाहते उपस्थित होते, तर पाकिस्तानी चाहत्यांची उपस्थिती फारच कमी होती. व्हिसाच्या समस्येमुळे पाकिस्तानी चाहते भारतात पोहोचू शकले नाहीत. अहमदाबादमध्ये भारताकडून पाकिस्तानला सात गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकांत १९१ धावांवर गारद झाला. कर्णधार बाबर आझमने ५० धावांची तर मोहम्मद रिझवानने ४९ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात भारताने ३०.३ षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. कर्णधार रोहित शर्माने ८६ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wasim akram angry over babar azam taking the jersey from virat kohli said it was not the day to do this avw