ICC World Cup 2023: विश्वचषक २०२३च्या ३३व्या सामन्यात श्रीलंकेला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत ५५ धावांत सर्वबाद केले. यादरम्यान मोहम्मद शमीने पाच आणि मोहम्मद सिराजने तीन विकेट्स घेतल्या. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन रझाने भारतीय गोलंदाजांच्या या शानदार कामगिरीवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने बीसीसीआय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (आयसीसी) विचित्र आरोप केले. यावर वसीम अक्रमनेही संताप व्यक्त केला आणि त्याला सुनावले.
हसन रझाने भारतीय गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले
हसन म्हणाला की, “भारत जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा खेळपट्टी वेगळी असते आणि गोलंदाजांना स्विंग मिळत नाही. पण त्याच खेळपट्टीवर भारत गोलंदाजी करतो तेव्हा त्याला स्विंग मिळू लागते. आयसीसी भारतीय गोलंदाजांना वेगवेगळे चेंडू देत आहे.” भारतीय गोलंदाजीदरम्यान चेंडू बदलत असल्याचा आरोप पाकिस्तानी खेळाडू रझाने केला आहे. आता माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने त्यांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
हसन रझा नेमकं काय म्हणाला होता?
माजी पाकिस्तानी क्रिकेटर हसन रझा यांनी एका पाकिस्तानी वाहिनीवर बोलताना सांगितले होते की, “या वर्षात अनेक गोष्टी भारताच्या बाजूने गेल्या आहेत. मग ते पुनरावलोकन असो किंवा आणखी काही. मोहम्मद शमी आणि सिराजची गोलंदाजी इतर गोलंदाजांपेक्षा वेगळी कशी आहे? आम्ही पण एकेकाळी खेळायचो. तेव्हा चेंडू रिव्हर्स स्विंग व्हायचा. पण इथे वेगळच काहीतरी होत आहे? मला असे वाटते की चेंडू बदलला जात आहे. आयसीसी त्यांना चेंडू देत आहे की बीसीसीआय देत आहे, याची चौकशी व्हायल हवा. आयसीसीने येथे काय चालले आहे ते एकदा पाहावे.”
वसीम अक्रमने हसन रझावर संताप व्यक्त केला आहे. वसीमने त्याला सडेतोड उत्तर दिले, तो म्हणाला, “मला जाणून घ्यायचे आहे की ते आजकाल ते काय खात आहेत. अगदी मलाही जाणून घेण्याची इच्छा आहे. मला असे वाटते की, त्यांचे डोके ठिकाणावर नाही. ते जे बोलत आहे हा खूप मोठा विनोद वाटतो. जर तुम्हाला तुमचा अपमान करून घ्यायचा असेल तर तो तुम्ही करा, पण आम्हाला बदनाम करू नका. रझा जे बोलला हे खूप हास्यास्पद होते.”
पुढे वसीम अक्रम म्हणाला, “चेंडू निवडण्याची प्रक्रिया कशी असते हे मी तुम्हाला सांगतो. खूप साधी गोष्ट असते, सामन्यापूर्वी अंपायर दोन्ही संघाकडे येतात. त्यांच्याकडे १२ चेंडूंचा खोका असतो. गोलंदाजी करणारा संघ प्रथम दोन चेंडू निवडतो आणि अंपायर ते स्वतःकडे ठेवून घेतात. त्यानंतर दोन चेंडू अंपायर निवडतात कारण संघाने निवडलेले चेंडू जर खराब झाले तर दुसरे चेंडू वापरता येतील. त्यानंतर अंपायर फलंदाजी करण्याऱ्या संघाकडे जातात आणि फलंदाजी करणारा संघही दोन चेंडू घेतो. अंपायर परत दोन चेंडू जर हे चेंडू खराब झाले तर आणखी दोन चेंडू स्वतःकडे ठेवतो. अशाप्रकारे आठ चेंडू एका सामन्यासाठी निवडले जातात त्यातील चार अंपायर निवडतात आणि चार चेंडू दोन संघ निवडतात. त्यामुळे अशी वायफळ बडबड करणे या लोकांनी थांबवावे.”