आशिया चषक आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेची आगामी आव्हाने लक्षात घेता पाकिस्तान क्रिकेट संघासाठी मुख्य प्रशिक्षक तसेच फलंदाजी आणि गोलंदाजीचे प्रशिक्षक निवडण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) चारसदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे.
प्रशिक्षकपदाच्या समितीमध्ये माजी कर्णधार जावेद मियाँदाद आणि वसिम अक्रम यांचा समावेश आहे. या समितीत माजी कर्णधार इंतिखाब आलम यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी सुभान अहमद यांचीही निवड करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ फेब्रुवारी असली तरी परदेशी उमेदवारांनी अर्ज करायचा की नाही, हे पीसीबीच्या जाहिरातीत नमूद करण्यात आलेले नाही.

Story img Loader