Wasim Akram’s advice to Pakistan veterans to play domestic cricket: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान संघाची जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये गणना केली जात होती, परंतु जेव्हा स्पर्धा सुरू झाली तेव्हा त्यांची कामगिरी पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. पाकिस्तान संघाने पहिल्या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत विजय मिळवला, मात्र तिसऱ्या सामन्यात भारताविरुद्धच्या पराभवानंतर आपली लय गमावली. परिस्थिती अशी होती की त्याला सलग चार सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. सध्या ते उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी संघर्ष करत आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने एक मोठं वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ए स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटर वसीम अक्रम म्हणाला, ‘असे अनेक खेळाडू आहेत जे देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी उपलब्ध आहेत, पण ते टीव्हीसमोर बसलेले आहेत. असे असूनही त्यांना पाकिस्तानकडून खेळायचे आहे. हे कसे शक्य आहे?’ माजी कर्णधाराचे मत आहे की, जर तुम्हाला राष्ट्रीय संघात पुनरागमन करायचे असेल तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून स्वत:ला सिद्ध करावे लागेल.’

पाकिस्तानच्या अनेक अनुभवी खेळाडूंना २०२३ च्या विश्वचषकासाठी संघात स्थान मिळालेले नाही. यामध्ये मोहम्मद आमिर, इमाद वसीम अशा काही निवडक खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. वसीम अक्रमने या खेळाडूंचे नाव न घेता त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. हे खेळाडू सध्या अनेक टीव्ही शोमध्ये पाहुणे म्हणून काम करत आहेत.

हेही वाचा – World Cup 2023: न्यूझीलंड की पाकिस्तान, इरफान पठाणला उपांत्य फेरीत कोणाला पाहायचे आहे? उत्तर जाणून वाटेल आश्चर्य

उपांत्य फेरीतील चौथ्या स्थानासाठी तीन संघात रस्सीखेच –

सध्या न्यूझीलंडचे आठ गुण आणि नेट रन रेट +०.३९८ आहेत. पराभव किंवा पावसामुळे सामना रद्द झाल्यास तो स्पर्धेतून बाहेर पडेल, हे त्याला माहीत आहे. सध्या न्यूझीलंड गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचेही आठ गुण आहेत. पाकिस्तानचा नेट रन रेट ०.०३६ आहे, तर अफगाणिस्तानचा -०.३३८ आहे. या तीन संघांत उपांत्य फेरीतील चौथ्या स्थानासाठी रस्सीखेच सुरु आहे.