आयपीएल विजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचे मार्गदर्शक आणि गोलंदाजीचे प्रशिक्षक वसिम अक्रम यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मागील तीन हंगामांमध्ये अक्रम कोलकाता संघाला मार्गदर्शन करीत होते. मुख्य प्रशिक्षक ट्रॅव्हर बेलिस आणि कप्तान गौतम गंभीरसोबत अक्रम यांनी कोलकाता नाइट रायडर्सला विजेतेपद मिळवून देण्यासाठी योजना आखली होती. तैमूर आणि अकबर या आपल्या मुलांना अधिक वेळ देता यावा, याकरिता अक्रम यांनी पदत्याग केला आहे, असे स्पष्टीकरण कोलकाता नाइट रायडर्सच्या संघ व्यवस्थापनाने दिले आहे.
अक्रमने सोडले केकेआरचे गोलंदाजीचे प्रशिक्षकपद
आयपीएल विजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचे मार्गदर्शक आणि गोलंदाजीचे प्रशिक्षक वसिम अक्रम यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मागील तीन हंगामांमध्ये अक्रम कोलकाता संघाला मार्गदर्शन करीत होते.
First published on: 26-02-2013 at 03:44 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wasim akram steps down from kkr bowling coachs post