माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर आजकाल आपल्या सोशल मीडियावरील उपस्थितीमुळे जास्त चर्चेत असतो. प्रतिस्पर्धी देशांतील खेळाडूंना टोमणे मारने असो किंवा भारतीय खेळाडूंना खास आपल्या गुढ शैलीमध्ये सल्ले देणे असो दोन्हीही गोष्टी तो अगदी चोखपणे पार पाडतो. ट्विटरवरती तो विशेष सक्रिय असतो. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन आणि वसीम जाफरची जुगलबंदी तर जगविख्यात आहे. दोघांमध्ये पुन्हा एकदा ट्विटरवर शाब्दिक बाचाबाची बघायला मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसीम जाफरने सोमवारी लॉर्ड्स स्टेडियममधील त्याचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला. त्यानंतर वॉनने त्याला ट्रोल केले. जाफरने फोटो ट्विट करून म्हटले होते की, “होम ऑफ क्रिकेटमध्ये (लॉर्ड्स) सूर्य चमकत आहे आणि वातावरण आल्हाददायक आहे.” हा फोटो रिट्विट करत वॉन म्हणाला, “वसीम, माझ्या पहिल्या कसोटी बळीला २० वर्षे झाली त्याचा आनंद साजरा करण्यासठी तू इथे आला आहेस का? वॉनने २००२ मध्ये लॉर्ड्सवर जाफरला बाद केले होते. यानंतर जाफरने वॉनला चोख प्रत्युत्तर दिले.

भारतीय संघाने २००७ मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. हा फोटो शेअर करत जाफरने वॉनला उत्तर दिले की, “मायकल, मी या विजयाची १५ वर्षे साजरी करण्यासाठी येथे आलो आहे.” वसीम जाफरने ती मालिका खेळली होती. तीन सामन्यांत त्याने १८५ धावा केल्या होत्या.

मायकल वॉन आणि जाफरची ट्विटरवर जुगलबंदी सुरूच असते. भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या यूट्यूब चॅनलवर वॉनने सांगितले होते की, ‘२००२ मध्ये जाफरला बाद केल्यापासून दोघांमधील वैर सुरू झाले. वॉनच्या सहा कसोटी बळींमध्ये सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे. परंतु, त्याला वसीम जाफरला चिडवण्यात जास्त आनंद मिळतो.’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wasim jaffer and michael vaughan locks horn on twitter vkk