मुळचा मुंबईचा मात्र सध्या विदर्भाकडून रणजी क्रिकेट खेळणाऱ्या वासिम जाफरने रणजी क्रिकेटमध्ये आपल्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. रणजी क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पा गाठणारा वासिम पहिला फलंदाज ठरला आहे. बडोद्याविरुद्ध सामन्यामध्ये वासिमने ही कामगिरी केली. नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना सुरु आहे.
वासिम जाफरने विदर्भाचा कर्णधार फैज फजलच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 300 धावांची भागीदारी रचली. फजल माघारी परतल्यानंतर वासिमने हा अनोखा विक्रम आपल्या नावावर जमा केला आहे. याचसोबत वासिमने आपला जुना मुंबईकर सहकारी अमोल मुझुमदारचा विक्रमही मोडला आहे. वासिमने पहिल्या डावात 153 धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक – विदर्भ पहिला डाव 529/6 डाव घोषित. वासिम जाफर 153, फैज फजल 151, अक्षय वाडकर नाबाद 102. लुकमन मेरीवाला 2/79
विरुद्ध बडोदा, केदार देवधर, आदित्य वाघमोडे दोन्ही फलंदाज नाबाद 20
दुसऱ्या दिवसाअखेरीस बडोदा 41/0