Wasim Jaffer criticized the BCCI for selecting the Indian Test team: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाबाबत गदारोळ झाला आहे. यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांच्या कसोटी संघात निवड करण्याबाबत अनेक माजी क्रिकेटपटूंनी निवडकर्त्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडलेल्या संघावर नाराजी व्यक्त करत निवडकर्त्यांवर तीन प्रश्न विचारले आहेत, ज्यांची उत्तरे निवडकर्त्यांना देणे सोपे जाणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसीम जाफरचे निवडकर्त्यांना तीन प्रश्न –

वसीम जाफरने प्रथम कसोटी संघातील चार सलामीवीरांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने म्हटले आहे की, कसोटी संघात चार सलामीवीरांची निवड करण्याची काय गरज होती? त्याऐवजी, तुम्ही मधल्या फळीत अतिरिक्त फलंदाज म्हणून सरफराज खानची निवड करू शकत होता, ज्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिल व्यतिरिक्त यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांची कसोटी संघात निवड करण्यात आली आहे.

गायकवाड अचानक रांगेत कसा आला?

वसीम जाफरने आपल्या दुसर्‍या प्रश्नात विचारले आहे की, अभिमन्यू ईश्वरन आणि प्रियांक पांचाल हे भारतीय कसोटी संघाचे दार बऱ्याच दिवसांपासून ठोठावत आहेत. त्याने रणजी ट्रॉफी आणि इंडिया अ साठी अनेक सुरेख खेळी खेळल्या आहेत, तो फक्त आयपीएल न खेळल्यामुळे त्याची निवड झाली नाही का? ऋतुराज गायकवाड अचानक रांगेत कसा आला? रणजी ट्रॉफीच्या नुकत्याच झालेल्या हंगामात पांचाळने १००० पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत.

हेही वाचा –T20 Blast 2023: जोस बटलरने मोडला रोहित शर्माचा मोठा विक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘हा’ कारनामा करणारा ठरला नववा खेळाडू

शमीला विश्रांती का देण्यात आली?

वसीम जाफरचा तिसरा प्रश्न मोहम्मद शमीशी संबंधित आहे. त्याने म्हटले आहे की, ‘मोहम्मद शमीला विश्रांती देण्याचा निर्णय आश्चर्यकारक आहे, त्याने महिनाभराचा ब्रेक घेतला आहे. मला वाटते शमी हा असा गोलंदाज आहे, जो जितका अधिक खेळेल तितका चांगला होईल. मोहम्मद शमीची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड झाली नाही. तो डब्ल्यूटीसी फायनलमध्ये खेळताना दिसला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wasim jaffer criticized bcci for selecting indian test team for the west indies tour and asked three questions vbm
Show comments