आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज भारत-पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांचा या स्पर्धेतील हा पहिलाच सामना असल्यामुळे विजयासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न केला जाणार आहे. भारत-पाक पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्यामुळे या सामन्याकडे जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावर तर दोन्ही बाजूच्या चाहत्यांमध्ये युद्धच पेटले आहे. समाजमाध्यमांवर वेगवेगळे मीम्सदेखील शेअर केले जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यानेदेखील एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने भारत आणि पाकिस्तान संघाच्या चाहत्यांची स्थिती काय असेल, यावर मार्मिक भाष्य केले आहे.
हेही वाचा >>> IND vs PAK Asia Cup 2022 : भारताकडे विराट तर पाकिस्तानकडे कोण? जाणून घ्या दोन्ही संघांचे Playing 11
भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो क्रिकेट जगतात घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडींवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतो. सध्या भारत-पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या लढतीची सगळीकडे चर्चा आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सोशल मीडियावर वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. तसेच मीम्सदेखील पाऊस पडला आहे. वसीम जाफरनेदेखील एक छोटा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये सोशल मीडियावर काय स्थिती आहे, हे सांगण्यासाठी हा मार्मिक व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून नेटकरी त्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
हेही वाचा >>> Asia Cup 2022 : भारताविरोधात खेळताना पाकिस्तानी खेळाडू दंडाला बांधणार काळ्या फिती, कारणही आलं समोर
भारतीय संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल
पाकिस्तान संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन
बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), खुशदिल शाह, हैदर अली, मोहम्मद नवाज, शादाब खान, हारिस रौफ, नसीम शाह, उस्मान कादीर, शाहनवाज दहनी