एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात न्यूझीलंड क्रिकेट संघाने यजमान इंग्लंड क्रिकेट संघाचा ८ गडी राखून पराभव केला. त्यामुळे टॉम लॅथमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या न्यूझीलंडने इंग्लंडला कसोटी मालिकेत १-० अशी मात दिली. केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडने इंग्लंडमध्ये दमदार कामगिरी केली. आता त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाविरुद्ध उभे राहायचे आहे. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या या सामन्याचे भविष्य अनेक क्रीडापंडितांनी वर्तवले आहे. यात मायकेल वॉनही मागे राहिलेला नाही. मात्र, वॉनने केलेले ट्वीट भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरला आवडले नाही. जाफरने आपल्या अंदाजात त्याला खोचक प्रतिक्रिया दिली.

मायकेल वॉन आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला, ”न्यूझीलंड हा उच्च स्तरीय संघ आहे. फलंदाजीची असो वा गोलंदाजी त्यांना परिस्थिती चांगली कळते. त्यांनी उत्तम झेलही घेतले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ते भारतीय संघाला पराभूत करतील असा माझा अंदाज आहे.” या ट्वीटनंतर वॉनला भारतीय चाहत्यांकडून ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. तू जे काही बोलतो, ते कधीही योग्य सिद्ध होत नाही, असे काहीजण वॉनला म्हणाले.

हेही वाचा – अस्सं आहे तर..! शुबमन गिल आणि लाल रुमालाचं ‘कनेक्शन’ तुम्हाला माहीत आहे का?

भारताच्या जाफरने मात्र वॉनला मजेशीर अंदाजात उत्तर दिले. त्याने वेलकम चित्रपटातील नाना पाटेकरचा ‘तेरा काम हो गया तू जा’ हा डायलॉग वापरत वॉनला ट्रोल केले.

 

हेही वाचा – मिताली राजने सोशल मीडियावर जिंकली चाहत्यांची मने, ६ वर्षाच्या चिमुरडीला करणार मदत

२२ वर्षांनंतर न्यूझीलंडचा इंग्लंडमध्ये विजय

इंग्लंडच्या संघाने सात वर्षानंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली आहे. २०१४मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील इंग्लंडला ०-१ असा पराभव पत्करावा लागला होता. २२ वर्षानंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्यात न्यूझीलंडचा संघ यशस्वी ठरला आहे. १९९९मध्ये शेवटच्या वेळी स्टीफन फ्लेमिंगच्या नेतृत्वात किवी संघाने इंग्लंडच्या संघाला त्यांच्या मातीत चार सामन्यांच्या मालिकेत २-१ने पराभूत केले होते.

Story img Loader