ऑक्टोबर महिन्यामध्ये होऊ घातलेल्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झालीय. मागील अनेक दिवसांपासून या घोषणेसंदर्भात चर्चा होत असतानाच एक गोड सप्राइज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने भारतीय क्रिकेट चाहत्यांना दिलं आहे. हे सप्राइज आहे भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी. होय, धोनी थेट या संघाचा भाग नसला तरी तो मेंटॉर म्हणजेच मार्गदर्शक म्हणून या संघासोबत असणार आहे. या घोषणेनंतर संघ निवड या मुख्य विषयापेक्षा सोशल नेटवर्किंगवर धोनीचीच अधिक चर्चा दिसून येत आहे. त्यातच आपल्या भन्नाट ट्विटसाठी लोकप्रीय असणारा भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने अगदी भन्नाट पद्धतीने धोनीची या आगळ्यावेगळ्या जबाबदारीसाठी निवड झाल्याबद्दल त्यांच अभिनंदन केलं आहे. या ट्विटमधून जाफरने धोनीच्या या सिलेक्शनमागील रजनीकांत कनेक्शनवर भाष्य केलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की पाहा हे फोटो >> विराटला त्या सेलिब्रेशनमुळे ‘Classless’ म्हणणाऱ्या ब्रिटीश मीडियाचा जाफरने उतरवला माज

ओमान आणि यूएईमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी भारताचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल म्हणून ख्याती असणारा महेंद्र सिंह धोनी देखील भारतीय संघासोबत असणार आहे. अर्थात, धोनीनं आयपीएल वगळता इतर सर्व क्रिकेट प्रकारांमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो आता या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहे. यंदाच्या T20 World Cup मध्ये धोनी भारतीय संघाचा मेंटॉर अर्थात मार्गदर्शक म्हणून संघासोबत असेल, असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांना प्रत्यक्ष मैदानावर खेळणारा धोनी जरी पाहता येणार नसला, तरी मैदानाबाहेर राहून रणनीती करणारा धोनी त्यांना पाहता येणार आहे.

नक्की पाहा हे फोटो >> आईच्या भीतीपोटी लागलेल्या सवयीमुळे बुमरा आज झालाय ‘यॉर्कर किंग’

या घोषणेनंतर धोनीसंदर्भात सोशल नेटवर्किंगवर चर्चा सुरु झालीय. धोनीच्या अनुभवाचा भारतीय संघाला नक्कीच फायदा होणार आहे. असं असलं तरी धोनीची नियुक्ती ही अनेकांसाठी सप्राइज पॅकेज ठरलीय. त्यामुळेच वसीम जाफरने सर्वच क्रिकेट चाहत्यांच्या भावना व्यक्त करणारं एक रजनीकांतचं भन्नाट मीम शेअर केलं आहे. शिवाजी द बॉस या चित्रपटामधील रजनीकांतचा क्यो हिला डाला ना हा फोनवरील संवाद साधतानाचा फोटो जाफरने ट्विट केलाय. “धोनीने अचानक भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये काही अशापद्धतीनेच एन्ट्री केलीय,” अशा कॅप्शनसहीत जाफरने हा फोटो शेअर केलाय.

काही मिनिटांमध्ये चार हजारहून अधिक जणांनी हा फोटो रिट्विट करत शेअर केलाय. तर तासाभरामध्ये २६ हजारांहून अधिक जणांनी हा फोटो लाइक केलाय.

नक्की वाचा >> समजून घ्या : बुमराच्या घातक यॉर्करमागील तंत्र; कोणत्याही फलंदाजाला क्रीज टीकून राहणंही का होतं मुश्कील?

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जय शाह आणि चेतन शर्मा यांच्या उपस्थितीत संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दीक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांची निवड करण्यात आली आहे. सुर्यकुमार यादव, राहुल चहर, ईशान किशन, वरुण चक्रवर्ती यांना वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर हे राखीव खेळाडू असतील, असं बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wasim jaffer tweets kyu hila dala na after ms dhoni roped in as mentor for team india ahead of t20 world cup scsg