राजीव शुक्ला यांचे स्पष्टीकरण

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदासाठी माझा शशांक मनोहर यांना संपूर्ण पाठिंबा असून, मी या प्रतिष्ठेच्या पदाच्या शर्यतीत कधीच नव्हतो, असे स्पष्टीकरण आयपीएचे प्रमुख राजीव शुक्ला यांनी दिले आहे.

अनुराग ठाकूर आणि शरद पवार यांच्या पाठिंब्यासह मनोहर दुसऱ्यांदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर विराजमान होण्यासाठी सज्ज झाले आहेत. दालमिया यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदाबाबत शुक्ला यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मनोहर यांच्या नियुक्तीमुळे बीसीसीआयचा कारभार अधिक सुधारेल, असे मत शुक्ला यांनी व्यक्त केले.

‘‘आयसीसी कार्याध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना रविवारी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत हजर राहता येणार नाही. परंतु परिस्थिती ओढवल्यास त्यांना मतदान करता येईल. मात्र त्यांच्या मतामुळे फारसा फरक पडेल, असे वाटत नाही,’’ असे शुक्ला यांनी सांगितले.

Story img Loader