एका छोट्या विषाणूने जगभरात सध्या साऱ्यांना ‘लॉकडाउन’ केले आहे. करोनाच्या भीतीने सारं काही बंद आहे. भारतातील लोकप्रिय IPL स्पर्धेचे आयोजनदेखील अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे सारेच जण घरात आहे. अशा वेळी जुने फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्याचा एक ट्रेंड सोशल मीडियावर आला आहे. याच ट्रेंडला अनुसरून CSK ने एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.
“सेहवाग कायम सचिन, द्रविडच्या सावलीत लपला”; पाकिस्तानी खेळाडूचं मत
भारतीय संघात एके काळी धमाकेदार खेळी करणारी जोडी म्हणजे महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना… या जोडीने आपल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताला अनेक विजय मिळवून दिले. IPL मध्येही या दोघांनी आपल्या संघाला धमाकेदार फलंदाजीच्या बळावर विजेतेपदं मिळवून दिली. मात्र गेल्या वर्षभरापासून हे दोघेही क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहेत. पण IPL 2020 साठी चेन्नई सुपर किंग्जचे दोन स्टार खेळाडू पुन्हा एकत्र आले होते.
१९ वर्षाचा सचिन कसा दिसायचा माहितीये का?
CSK ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये सुरेश रैनाची ‘डॅशिंग एन्ट्री’ होताना दिसली. त्यानंतर रैनाने तेथील भिंतीवर लावलेले फोटो पाहिले. नंतर CSK च्या चाहत्यांना भावूक करणारा क्षण घडताना दिसला. सुरेश रैनाने आपला सहकारी धोनीला मिठी मारली आणि त्याची गळाभेट घेतली. याच वेळी त्याने “दाढीचे केस पांढरे झाले रे” असं म्हणत धोनीची मस्करी केली.
Like the sky! @msdhoni @ImRaina #WhistlePodu pic.twitter.com/joMA6Infs4
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 9, 2020
महेंद्रसिंग धोनी आणि मुंगूस बॅट… हेडनने सांगितला किस्सा
दरम्यान, भारताचा माजी कर्णधार धोनी त्याआधीच CSK कडून खेळण्यासाठी नेट्समध्ये आला होता. त्यावेळी धोनीचेही जंगी स्वागत करण्यात आले होते. गतविजेते मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिला सामना वानखेडे मैदानावर रंगणार होता. त्या सामन्यासाठी चेन्नईच्या खेळाडूंनी दणक्यात सरावाला सुरुवात केली होती. संघाचा कर्णधार आणि महत्वपूर्ण खेळाडू महेंद्रसिंह धोनीनेही प्रदीर्घ कालावधीनंतर सरावासाठी मैदानात पाऊल ठेवलं होतं. धोनीला सराव करताना पाहण्यासाठी मैदानात अनेक चाहत्यांची गर्दी जमली होती. धोनी सरावासाठी आला, त्या क्षणी चाहत्यांनी एकच जल्लोष केला. पण चाहत्यांचे दुर्दैव, म्हणजे IPL अद्याप सुरू झालेले नसल्याने त्यांना आपल्या धोनीला क्रिकेटच्या मैदानावर पाहण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.