ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपूट डेव्हिड वॉर्नर याचं भारतप्रेम सगळ्यांनाच माहिती आहे. पण बॉलिवूडच्या गाण्यांचंही त्याला वेड आहे याची कोणालाही कल्पना नव्हती. नुकताच कतरिना कैफच्या ‘शीला की जवानी’ गाण्यावर त्याचा डान्स करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओमध्ये तो एकटा नाचत नव्हता, तर त्याच्यासोबत त्याची गोंडस लेकही डान्स करताना दिसली होती. पण आता डेव्हिड वॉर्नरचा सहकुटुंब, सहपरिवार डान्स व्हिडीओ फॅन्सच्या पसंतीस उतरत आहे.

सचिनच्या ‘स्ट्रेट ड्राईव्ह’वरून मुंबई पोलिसांचं हटके ट्विट

वॉर्नरने एक झकास व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओत त्याची मुलगी, त्याचं छोटं बाळ, तो स्वत: आणि वॉर्नरची पत्नी कँडी असे सारेच जण डान्स करताना दिसत आहेत. डेव्हिड वॉर्नरने काही दिवसांपूर्वीच टिकटॉक अकाऊंट सुरु केलं आहे. आपले व्हिडीओ सध्या तो तिथे पोस्ट करत आहे. तेथेच त्याने आपला सहकुटुंब डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि तो व्हिड़ीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. एका झकासपैकी म्यूझीकवर त्यांचा डान्स सुरू आहे. हा व्हिडीओ फॅन्सच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

पाहा व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

#SATURDAYVIBES @candywarner1

A post shared by David Warner (@davidwarner31) on

डेव्हिड आणि त्याची लेक दोन दिवसांपूर्वी बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करताना दिसले. डेव्हिड वॉर्नरने तो व्हिडीओ देखील इन्स्टाग्रामवर शेअर केला होता आणि त्या व्हिडीओला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

सचिनच्या आधीच ‘या’ खेळाडूने ठोकलं होतं वन-डे मध्ये द्विशतक

डेव्हिड वॉर्नर आयपीएमध्ये पुन्हा एकदा सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्त्व करण्यास सज्ज होता. पण करोनामुळे आयपीएल पुढे ढकलण्यात आली आहे. गुरुवारी बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी आयपीएल पुढे ढकलत असल्याचं सांगितलं आहे.

डेव्हिड वॉर्नर

दरम्यान, २७ फेब्रुवारीला सनरायझर्स हैदराबाद संघाकडून ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. सनरायझर्स संघाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही घोषणा केली होती. त्याचसोबत त्यांनी वॉर्नरचा एक खास संदेशही ट्विट केला होता. “हैदराबाद संघाच्या सगळ्या चाहत्यांना माझा नमस्कार. माझी हैदराबाद संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. मला मिळालेल्या या संधीसाठी मी संघ व्यवस्थापनाचा आभारी आहे. केन विल्यमसन आणि भुवनेश्वर कुमार यांनी संघाचे चांगले नेतृत्व केले. IPL जिंकण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू”, असा संदेश त्याने व्हिडीओद्वारे दिला होता.

Story img Loader