आजचा दिवस हा चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) वेगवान गोलंदाज दीपक चाहरसाठी अविस्मरणीय दिवस होता. आज पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला ६ गड्यांनी पराभवाला सामोरे जावे लागले, पण दीपक चहरने हा दिवस चेन्नईच्या चाहत्यांसाठी आनंदात बदलून टाकला. पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर दीपक चहरने त्याची मैत्रीण जया भारद्वाजला स्टेडियममध्ये सर्वांसमोर प्रपोज केले.

या घटनेनंतर दीपक आणि जया यांनी हा खास क्षण सीएसकेच्या कुटुंबासोबत शेअर केला. सीएसकेचे खेळाडू आणि त्यांचे कुटुंबही तेथे उपस्थित होते. सर्वांनी त्यांच्यासोबत दीपक आणि जयाचा आनंद साजरा केला. केक कापल्यानंतर धोनी आणि सहकाऱ्यांनी दीपकला केकने अंघोळ घातली.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

स्टेडियममध्ये प्रपोज केल्यानंतर उपस्थित लोकांनी टाळ्यांच्या गजरात दोघांचे अभिनंदन केले. दीपकची मैत्रीण जया भारद्वाज दिल्लीची आहे आणि एका कॉर्पोरेट कंपनीत काम करते. जया प्रसिद्ध रियालिटी शो ‘बिग बॉस’ सीझन ५ चा स्पर्धक सिद्धार्थ भारद्वाजची बहीण आहे.

हेही वाचा – T20 World Cup : “भारताला हरवा आणि मिळवा…”, रमीझ राजांची पाकिस्तानी खेळाडूंना ‘बंपर’ ऑफर!

दीपकला केकची अंघोळ

सामना संपल्यानंतर जेव्हा चेन्नई सुपर किंग्जचा संघ हॉटेलमध्ये परतला तेव्हा या नव्या जोडप्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. हॉटेल लॉबीमध्ये दीपक आणि जयासाठी केक तयार होता. दोघांनी मिळून केक कापला आणि एकमेकांना खाऊ घातला. यानंतर सुरेश रैनाने जयाला बाजूला होण्याचे संकेत दिले. मग धोनीने दीपकला घट्ट पकडले. यानंतर सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि संघातील इतर खेळाडूंनी दीपकला केकमध्ये अंघोळ घातली. त्याचवेळी साक्षी धोनीने जयाला मिठी मारली आणि तिचे अभिनंदन केले. सुरेश रैनाची मुलगी ग्रासिया देखील दीपक आणि जयाचे अभिनंदन करताना दिसली.

Story img Loader