महेंद्रसिंह धोनीची लोकप्रियता ही सर्वांना चांगलीच माहिती आहे. भारतासह जगभरातील अनेक क्रिकेट प्रेमींना धोनी आपलासा वाटतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या वन-डे सामन्यात चाहत्यांच्या याच प्रेमाचं दर्शन घडून आलेलं पहायला मिळालं. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 231 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात काहीशी धिमी झाली. रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर, धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळी मेलबर्नच्या मैदानावर उपस्थित असलेल्या चाहत्यांनी धोनी….धोनी या नावाचा गरज करत मैदान दणाणून सोडलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

अंतिम सामन्यात धोनीने 87 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या एकदिवसीय मालिकेत धोनीने तिन्ही सामन्यांमध्ये अर्धशतकं झळकावली. मालिकेत केलेल्या खेळासाठी धोनीला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारत न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या मालिकेत भारत 5 वन-डे आणि 3 टी-20 सामने खेळेल.

Story img Loader