बंदीची शिक्षा भोगून झाल्यानंतर हार्दिक पांड्याने भारतीय संघात तिसऱ्या वन-डे सामन्यासाठी पुनरागमन केलं आहे. नाणेफेक जिंकून यजमान न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यातही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. भुवनेश्वर कुमार आणि शमीने सलामीवीरांना माघारी धाडलं. यानंतर कर्णधार केन विल्यमसनने काहीकाळासाठी न्यूझीलंडचा डाव सावरला.

कर्णधार विल्यमसन मोठी भागीदारी रचणार असं वाटत असतानाच, युझवेंद्र चहलने त्याला आपल्या जाळ्यात अडकवलं. पुढे येऊन फटका खेळणाऱ्या विल्यमसनचा झेल हार्दिक पांड्याने हवेत उडी मारत पकडला. त्याच्या या थरारक कॅचचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

दरम्यान पांड्यानेही आपल्याला संघात मिळालेल्या स्थानाचा पुरेपूर फायदा उठवला. दोन फलंदाजांना हार्दिकने माघारी धाडलं. दरम्यान हार्दिकने घेतलेल्या कॅचच अनेक मान्यवरांनीही कौतुक केलं आहे.

Story img Loader