करोना विषाणूचा सामना करण्यासाठी संपूर्ण जगभरात लॉकडाउन करण्यात आलं. या लॉकडाउन काळात वेळ जावा यासाठी अनेकांनी विविध युक्त्या शोधून काढल्या. इटलीतल्या दोन मुलींनी वेळ घालवण्यासाठी घराच्या टेरेसवर जात टेनिस खेळत असतानाचा व्हिडीओ बनवला होता. १३ वर्षीय व्हिक्टोरिया आणि ११ वर्षीय कॅरोला यांचा हा अनोखा भन्नाट प्रयोग सोशल मीडियावर चांगलाच गाजला. त्यांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली. इतकच नव्हे तर ATP ने देखील या मुलींचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत त्यांचं कौतुक केलं होतं.
Just incredible to see
Liguria, Italy #tennisathome pic.twitter.com/dh8bqlvFhj
— ATP Tour (@atptour) April 18, 2020
टेनिस जगताचा सम्राट अशी ओळख असलेल्या रॉजर फेडररने या दोन्ही मुलींना काही दिवसांपूर्वी एक सरप्राईज गिफ्ट दिलं. तो स्वतः या मुलींना भेटण्यासाठी इटलीत दाखल झाला होता. १० जुलैला फेडररने या मुलींना भेट देत त्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
From a rooftop match that went viral to meeting @rogerfederer.
Just incredible to see pic.twitter.com/LuozuHYJiT
— ATP Tour (@atptour) July 31, 2020
३८ वर्षीय फेडररने या मुलीचं कौतुक केलं. चाहत्यांना सरप्राईज देणं मला आवडतं, आणि टेनिसपटू म्हणून माझ्यासाठी हा खास क्षण असल्याचं फेडरर म्हणाला. दोन्ही मुलींच्या खास आग्रहास्तव फेडरर त्यांच्यासोबत टेनिसही खेळला.