वेस्ट इंडिज दौऱ्यात बाजी मारल्यानंतर भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. १५ सप्टेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. विंडीज दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या संघालाच निवड समितीने आफ्रिकेविरुद्ध मालिकेत संधी दिली आहे. हार्दिक पांड्याने आफ्रिकेविरुद्ध टी-२० संघात पुनरागमन केलं आहे. कृणाल पांड्यालाही या संघात स्थान मिळालं आहे.

आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी दोन्ही पांड्या बंधू सध्या सराव करत आहेत. या सरावादरम्यान हार्दिक पांड्याने कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर उंच फटके खेळण्याचा सराव केला. यादरम्यान हार्दिकचा एक फटका कृणालच्या डोक्याला लागता लागता राहिला. या सरावाचा छोटासा व्हिडीओ हार्दिकने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे, आणि आपल्या भावाची माफीही मागितली आहे.

आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी असा आहे भारताचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.

Story img Loader