इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ नुकताच लंडनमध्ये दाखल झाला आहे. २७ आणि २९ जुनरोजी भारत आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने खेळणार आहे. मात्र लंडनला पोहचेपर्यंत भारतीय संघाने विमानात नेहमीप्रमाणे धमाल-मस्ती केली. विमानात हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहलने हातात बुम घेतल्याचा अभिनय करत मुलाखत घ्यायला सुरुवात केली. आपल्या सहकाऱ्यांना विविध प्रश्न विचारुन हार्दिक पांड्याने विमानात धमाल उडवून दिली. भारतीय क्रिकेटपटूंची ही धमाल बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट केली आहे.

आयर्लंडविरुद्ध २ टी-२० सामने खेळल्यानंतर ३ जुलै पासून भारताचा इंग्लंड दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारत ३ टी-२०, ३ वन-डे आणि ५ कसोटी सामने खेळणार आहे.

Story img Loader