India vs West Indies, 2nd Test: पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीने भारताचा डाव वाचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. एकवेळ अशी होती जेव्हा भारताची १३९ धावांवर एकही विकेट गमावली नव्हती, पण दुसऱ्या सत्रात पुढच्या ४३ धावांत भारताने एक-दोन नव्हे तर चारही विकेट्स लागोपाठ गमावल्या. अशा स्थितीत धावा काढण्याचे आणि विकेट्स वाचवण्याचे संपूर्ण जबाबदारी विराट कोहलीच्या खांद्यावर आली. आपल्या कारकिर्दीतील ५००वा सामना खेळत कोहलीने संघाला या दबावातून तर बाहेर काढलेच शिवाय स्वतःला ७६व्या शतकाच्या जवळ आणून ठेवले आहे. जेव्हा पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कोहली ८७ धावांवर नाबाद होता, त्याने १६१ चेंडूंचा सामना केला ज्यामध्ये त्याने ८ चौकार मारले.

वेस्ट इंडिजच्या खेळाडूंवर दडपण आणण्यासाठी कोहलीनेही विकेट्सच्या दरम्यान धावत जाण्यासाठी मेहनत घेतली. भारतीय डावाच्या ७२व्या षटकात विराटने एक-दोन नव्हे तर तीन धावा केल्या. अशा परिस्थितीत त्याने डायव्हिंग करून आपल्या विकेटचे महत्त्वही सांगितले. हा डाईव्ह केल्यानंतर जेव्हा कोहली उभा राहिला तेव्हा त्याची प्रतिक्रिया स्टंप माइकमध्ये कैद झाली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट कोहली वेस्ट इंडिजच्या यष्टीरक्षकाला म्हणाला, “मी २०१२ पासून अशाच दोन-दोन धावा चोरत आहे, हे काही फार माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही.” डायव्हिंग केल्यानंतर कोहलीचा टी-शर्ट खराब झाला होता. या वयातही तो किती फिट आहे दिसून येते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा: IND vs WI: अ‍ॅशेस हिट अन् भारत-वेस्ट इंडीज मालिका फ्लॉप? सामना पाहायला येणाऱ्या झोपाळू चाहत्याचा Video व्हायरल

विराट कोहली आणि त्याच्या फिटनेसबाबत अधिक काही बोलायची गरज नाही. जेव्हापासून किंग कोहलीने त्याच्या फिटनेसवर काम करायला सुरुवात केली तेव्हापासून त्याने भारतीय क्रिकेट संघाचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. त्याला पाहून संपूर्ण संघात फिटनेसबाबत जागृती झाली आणि आज भारतीय संघाची गणना जगातील फिटनेस क्रिकेट अव्वल संघांमध्ये केली जाते. किंग कोहली सध्या केवळ क्रिकेटमधीलच नव्हे तर संपूर्ण क्रीडा विश्वातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू आहे.

हेही वाचा: Shikhar Dhawan: “विश्वचषकात खेळणे ही एक विशेष अनुभूती…”, शिखर धवनने वर्ल्डकपबाबत केले गुपित उघड

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने पहिल्या डावात ४ विकेट्स गमावून २८८ धावा केल्या होत्या. या सामन्यातही रोहित आणि यशस्वी या सलामीच्या जोडीने टीम इंडियाला शानदार सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी केली. यानंतर ४३ धावांच्या आत टीम इंडियाने ४ महत्त्वाचे विकेट्स गमावले. अशा स्थितीत विराट कोहलीने रवींद्र जडेजाच्या साथीने डाव सांभाळला आणि दिवसअखेरपर्यंत कोणतीही पडझड होऊ दिली नाही.

कोहली जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा ५वा खेळाडू ठरला

विराट कोहलीने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ८७ धावांच्या खेळीत अनेक नवे विक्रमही केले. ५००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. याशिवाय, आता कोहली जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याच्या बाबतीत ५व्या स्थानावर पोहोचला आहे.

Story img Loader