पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान होण्याच्या मार्गावर आहेत. इम्रान खान यांच्या तेहरिक- ए-इन्साफ पक्षाने निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. बहुमतासाठी लागणाऱ्या १३७ जागा इम्रान खान यांच्या पक्षाला मिळाल्या नसल्या तरीही अन्य पक्षांची मदत घेत इम्रान खान सत्ता स्थापन करतील असं चित्र तयार झालं आहे. मात्र इम्रान खान हा एक दिवस पाकिस्तानचा पंतप्रधान होईल अशी भविष्यवाणी भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी केली होती. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात समालोचन करताना गावसकरांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

समालोचनादरम्यान गावसकर यांच्यासोबत पाकिस्तानचे माजी खेळाडू रमिझ राजा उपस्थित होते. यावेळी चर्चेदरम्यान इम्रान खान यांचा विषय निघाला असता, रमिझ राजा यांनी इम्रान खानची नक्कलही केली. यावेळी गावसकर यांनी रमिझ राजाला, “जरा सांभाळून कदाचीत इम्रान पाकिस्तानचा पुढचा पंतप्रधान होऊ शकतो असं म्हटलं.”

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर इम्रान हा पाकिस्तानचं नेतृत्व करणारा पहिला खेळाडू ठरणार आहे. गुरुवारी संध्याकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना इम्रान खानने पाकिस्तानच्या भविष्याबद्दल आपले विचार मांडले. यावेळी शेजारी देश इराण, अफगाणिस्तान, भारत यांच्यासोबतचे संबंध सुधारण्यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचं इम्रान खान म्हणाले होते.