भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला असता तर प्रेक्षकांना ‘मौका-मौका’च्या जाहिरातीत काय पहायला मिळाले असते? विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारताला हरवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानी समर्थक व्यक्तिरेखेची ‘मौका-मौका’ जाहिरात क्रीडा जगतामध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. प्रत्येक प्रतिस्पर्ध्याविरुद्धच्या भारताच्या लढतीआधी येणाऱ्या या जाहिरातीने प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल आणि उत्कंठा निर्माण केली होती. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेदरम्यान, ‘मौका-मौका’चा ठेका चांगलाच घुमत होता. मात्र, भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची उपांत्यफेरीची लढत गमावली आणि टीम इंडिया विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडली. त्यामुळे भारत अंतिम फेरीत गेल्याच्यादृष्टीने बनविण्यात आलेली ‘मौका- मौका’ची जाहिरात टेलिव्हिजनवर प्रदर्शितच करण्यात आली नाही.
पाहा: भारत अंतिम फेरीत गेला असता तर… अशी असती ‘मौका-मौका’ची जाहिरात
भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला असता तर प्रेक्षकांना 'मौका-मौका'च्या जाहिरातीत काय पहायला मिळाले असते?
First published on: 06-04-2015 at 10:28 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch mauka mauka ad that was never aired after india loss to australia in world cup 2015 semi final