‘आयपीएल’साठी ‘व्होडाफोन’ने केलेल्या ‘सुपरचिअर डान्स स्टेप’ची सध्या जोरदार चर्चा आहे. आयपीएल म्हटलं की चौकार, षटकारांची आतषबाजी, मनोरंजन आणि सेलिब्रेशन. हाच धागा पकडून ‘व्होडाफोन’ने एका जाहिरातीच्या माध्यमातून तयार केलेल्या ‘हक्के बक्के’ गाण्याच्या डान्स स्टेप सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. खुद्द क्रिकेटपटूंनाही या गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरता आलेला नाही. नुकतेच फिरकीपटू आर.अश्विन आणि अष्टपैलू हार्दीक पंड्याने ‘हक्के बक्के’ गाण्यावर डान्स करून व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे.

Story img Loader