महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जने क्वालिफायर सामन्यात दिल्लीवर मात करुन अंतिम फेरीत आपलं स्थान नक्की केलं. दिल्लीने दिलेलं आव्हान चेन्नईने ४ गडी राखून पूर्ण केलं. या सामन्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकत्र संध्याकाळ घालवली. यावेळी महेंद्रसिंह धोनीची मुलगी झिवाने, दिल्लीचा यष्टीरक्षक ऋषभ पंतला चक्क हिंदीचे धडे दिले आहेत. झिवाचा हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

View this post on Instagram

Back to Basics !

A post shared by ZIVA SINGH DHONI (@ziva_singh_dhoni) on

दरम्यान, अंतिम फेरीत प्रवेश करण्याची चेन्नईची ही आठवी वेळ ठरली आहे. विजेतेपदासाठी चेन्नईला मुंबईशी दोन हात करायचे आहेत. बाराव्या हंगामात आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये मुंबईने चेन्नईवर मात केली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader