भारतीय महिला संघाची क्रिकेटपटू स्मृती मंधाना ही तिच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखली जाते. मात्र महिलांच्या टी-२० चॅलेंजर ट्रॉफीत भारत ब संघाकडून खेळताना स्मृतीने भल्याभल्या खेळाडूंनाही लाजवेल अशाप्रकारे हवेत उडी मारत एकहाती झेल टिपला.

भारत अ संघ फलंदाजी करताना, अनुजा पाटील सहावं षटक टाकत होती. देविका वैद्यने अनुजाच्या गोलंदाजीवर कव्हरचा फटका खेळला, मात्र स्मृतीने सीमारेषेच्या दिशेने जाणारा चेंडू हवेत उडी मारत एक हाती झेल टिपत देविका वैद्यला माघारी धाडलं…पाहा स्मृती मंधानाने घेतलेल्या या भन्नाट कॅचचा व्हिडीओ

सोशल मीडियावर स्मृती मंधानाच्या या भन्नाट कॅचचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. स्मृतीने आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर भारत ब संघाने टी-२० चॅलेंजर ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

Story img Loader