चपळ क्षेत्ररक्षणासाठी ओळख असलेल्या सुरेश रैनाने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात आपल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाचे कसब सिद्ध करून दाखवले. गुजरात लायन्स संघाचे कर्णधारपद सांभाळत असलेल्या सुरेश रैनाने कोलकाताच्या सुर्यकुमार यादवचा स्लिपला चित्त्यासारखी झेप घेऊन भन्नाट झेल टिपला. गुजरात संघाचा गोलंदाज ड्वेन स्मिथने टाकलेला चेंडू सुर्यकुमार यादवला खेळता आला नाही. त्याने अखेरच्या क्षणी चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने फ्लिक करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, पण सुरेश रैनाने क्षणार्धात झेप घेऊन एका हातात झेल टीपला आणि स्टेडियमवर जल्लोष सुरू झाला.

Story img Loader