Team India Coaches Big Statement Ahead Of WTC Final 2023 : इंडियन प्रीमियरल लीगचा १६ हंगाम संपला आहे. आता भारतीय चाहत्यांच्या नजरा ७ जूनला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे लागल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह भारताचे काही खेळाडू इंग्लंडला पोहोचले आहेत. उर्वरित खेळाडू लवकरच इंग्लंडला रवाना होणार आहेत. मागील काही दिवसांपासून सर्व खेळाडू फायनल सामन्याची तयारी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. याचदरम्यान भारताचे गोलंदाजी, फिल्डिंग आणि फलंदाजीच्या प्रशिक्षकांनी संघाच्या तयारीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. या दिग्गजांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांम्ब्रे यांनी या फायनलच्या टीम इंडियाच्या तयारीबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं, टीम इंडियाची तयारी खूप चांगल्या पद्धतीनं सुरु आहे. पहिलं सेशल थोडं अवघड राहिलं आहे. आम्ही गोलंदाजांच्या वर्कलोडला टेस्ट फॉर्मेटनुसार कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. हवामान आणि मैदान दोन्ही चांगले आहेत आणि आम्हाला या परिस्थितीत खेळण्याची सवय करावी लागेल.
इथे पाहा व्हिडीओ
टीम इंडियाचे फिल्डिंग प्रशिक्षक दिलीप म्हणाले, सर्व खेळाडू आयपीएल खेळून आले आहेत. अशातच आमचा पहिला प्रयत्न त्यांच्या वर्कलोडला कमी करण्याचा असेल. आयपीएलच्या तुलनेत कसोटी सामन्यात फिल्डिंगची परिस्थिती थोडी वेगळी असते. यावेळी आम्ही स्लिप आणि फ्लॅट कोचिंगवर जास्त फोकस करत आहोत.
टीम इंडियाचा फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, या सर्वांनी खूप मोठी टूर्नामेंट खेळली आहे. आयपीएल खेळल्यानंतर रेड बॉल क्रिकेट खेळणं सोपं नसतं. याची सवय लागण्यासाठी त्यांनी काही सेशनची गरज लागेल. तिन्ही प्रशिक्षकांचं म्हणणं आहे की, सामना सुरु होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. अशातच संघ जेवढा जास्त सराव करेल, त्यांच्यासाठी तेव्हढच चांगलं होईल. खेळाडूंकडून प्रत्येक सेशनमध्ये चांगली कामगिरी करून घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असेल.