Team India celebrating with the Asia Cup 2023 trophy after the win: आशिया चषक २०२३ च्या अंतिम सामन्यात, भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीतही आपले वर्चस्व दाखवत एकतर्फी विजय जेतेपद पटकावले. या सामन्यात श्रीलंकन ​​संघाचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्याचा संपूर्ण संघ १५.२ षटकांत केवळ ५० धावांवरच आटोपला. प्रत्युतरात टीम इंडियाने हे लक्ष्य ६.१ षटकांत कोणतेही विकेट न करता पूर्ण केले. विजयानंतर भारतीय संघाने एकच जल्लोष केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीम इंडियाने फायनल सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवत विक्रमी आठव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांच्या आनंदाला पारावर राहिला. त्यांच्या जल्लोषाचा व्हिडीओ बीसीसीने शेअर केला. ज्यामध्ये प्रत्येक खेळाडूंच्या चेहऱ्यांवर एक वेगळाच आनंद झळकत आहे. या सामन्यानंतर टीम इंडियाने आशिया चषक उंचावला.

वनडे फायनलमध्ये दुसऱ्यांदा १० गडी राखून मिळवला विजय –

वनडे क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा टीम इंडियाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात १० गडी राखून विजय मिळवला आहे. याआधी १९९८ साली झिम्बाब्वेविरुद्धच्या अंतिम सामन्यात १९७ धावांचे लक्ष्य एकही न गमावता पूर्ण केले होते. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने २००३ साली सिडनीच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध बिनबाद ११८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. टीम इंडिया आता तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने श्रीलंकेविरुद्धचा हा सामना जिंकून आपले स्थान निश्चित केले आहे.

वनडे क्रिकेटच्या इतिहासात अंतिम फेरीत सर्वाधिक चेंडू शिल्लक असताना विजय –

वनडे क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक चेंडू शिल्लक असताना जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघ आता पहिल्या स्थानावर आहे. टीम इंडियाने २६३ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता, जेव्हा त्यांनी २००३ मध्ये सिडनीच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध २२६ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला होता.

मोहम्मद सिराजने रचला इतिहास, घेतल्या ६ विकेट्स –

आशिया कप २०२३ च्या अंतिम सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद. सिराजने इतिहास रचला आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये कमी चेंडूत ५ बळी घेण्याचा पराक्रम केला. त्याने अवघ्या १६ चेंडूत ५ विकेट घेत इतिहास रचला आणि याआधी वनडे क्रिकेटमध्ये इतक्या कमी चेंडूंमध्ये विकेट घेण्याचा पराक्रम कोणत्याही भारतीय गोलंदाजाने केला नव्हता. त्याचबरोबर त्यान सात षटकांत २१ धावा देत एकूण ६ विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch the video of team india celebrating with the asia cup 2023 trophy after the win ind vs sl vbm
Show comments