भारत आणि बांगलादेश संघात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. हा सामना मीरपूर येथे खेळवला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशचा सलामीवीर नजमुल हुसेन शांतोने असे काही केले की, ज्यामुळए केएल राहुल भडकला. या घटनेनंतर राहुलने याबाबत पंचांकडे तक्रारही केली. ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

बांगलादेशच्या दुसऱ्या डावात ही घटना घडली. ३१४ धावांत सर्वबाद झाल्यानंतर, टीम इंडियाची नजर दिवसअखेर यजमानांच्या १-२ विकेट्स घेण्याव होती. तसेच दिवस मावळत असताना यजमानांनाही एकही विकेट गमवायची नव्हती. यामुळे शांतोने वेळ वाया घालवण्याचे अनेक प्रयत्न केले. एकदा त्याने एका सहकारी खेळाडूला बॅट बदलण्यासाठी मैदानावर बोलावले. शांतोला बॅट बदलण्यात बराच वेळ लागला. ज्यामुळे केएल राहुलला राग आला.

Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
IND vs BAN Test Series updates in marathi
IND vs BAN : भारत दौऱ्यासाठी बांगलादेशचा कसोटी संघ जाहीर! हत्येचा आरोप असणारा खेळाडू संघात कायम
Mark Wood out for the year with an elbow injury
ENG vs SL : इंग्लंड संघाला मोठा धक्का! वेगवान गोलंदाज मार्क वुड यंदा क्रिकेट खेळणार नाही; नेमकं काय आहे कारण?
PAK vs BAN Test Series Yasir Arafat on PCB
PAK vs BAN : पीसीबी म्हणजे एक सर्कस, त्यात अनेक जोकर भरलेत; माजी खेळाडूची कठोर शब्दात टीका
Bangladesh historic victory over Pakistan, cricket,
विश्लेषण : बांगलादेशने कसा साकारला पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय? भारताला धक्का देण्याची शक्यता किती?
World Test Championship 2025 How Pakistan Qualify for Final Match
PAK vs BAN: बांगलादेशकडून पराभूत झाल्यानंतरही पाकिस्तान WTC फायनलमध्ये पोहोचू शकतो? काय आहे समीकरण?
PAK vs BAN Mohammed Rizwan Broke Rishabh Pant and Andy Flower Record
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानने मोडला ऋषभ पंतचा विक्रम, पराभूत कसोटी सामन्यात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला पाकिस्तानी यष्टिरक्षक

त्यानंतर शांतोने कहरच केला. ज्या बॅटने तो आधीच खेळत होता, तीच बॅट शांतोने पुन्हा वापरली. ज्यामुळे कर्णधार केएल राहुल आणखीनच भडकला. कारण शांतो तिथे फक्त वेळ वाया घालवत होता, हे त्याच्या कृतीतून स्पष्ट दिसत होते. बांगलादेशी फलंदाजाच्या या कृत्याने केएल राहुल चांगलाच संतापला आणि त्याने पंचाकडे तक्रार केली.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, सामन्याचा दुसरा दिवस टीम इंडियाच्या नावावर राहिला. पहिल्या दिवशी बांगलादेशला २२७ धावांत गुंडाळल्यानंतर टीम इंडियाच्या नजरा यजमानांवर आघाडी मिळवण्याकडे होत्या. पहिल्या सत्रात तैजुल इस्लामने केएल राहुल, शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांच्या विकेट्स घेत भारताला अडचणीत आणले.

हेही वाचा – IPL Auction 2023: धोनीच्या सीएसके संघावर गंभीर आरोप करणारा खेळाडू, आता ‘या’ संघासाठी खेळताना दिसणार

मात्र दुसऱ्या सत्रात श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताला यश मिळवता आले. पंत ६व्यांदा नर्व्हस ९० चा बळी ठरला, त्याने ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ९३ धावांची खेळी खेळली. त्याचवेळी श्रेयस अय्यरने या कालावधीत ८७ धावा केल्या. दोन्ही फलंदाजांमध्ये पाचव्या विकेटसाठी १५९ धावांची भागीदारी झाली.