पाकिस्तानच्या देशांतर्गत स्पर्धेत खैबर पख्तुनख्वा आणि मध्य पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात मोहम्मद हॅरीस गंभीर दुखापत होण्यापासून थोडक्या वाचला. तो या सामन्यात हेल्मेट न घालता विकेटकीपिंग करत होता. दरम्यान, एक चेंडू वेगाने येऊन त्याच्या डोळ्याजवळ आदळला. त्यानंतर रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. हा चेंडू त्याच्या डोळ्याला लागला असता तर वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी त्याची कारकीर्द संपुष्टात आली असती.

पंजाब संघाची फलंदाजी सुरु असताना ५व्या षटकात ही घटना घडली. गोलंदाज खालिदचा शेवटचा चेंडू खेळपट्टीवर पडला आणि त्याने खूप वळण घेतले. फलंदाजाला शॉट खेळायचा होता, पण तो चुकला. दरम्यान, हॅरिसने विकेटच्या मागे चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. इथेही त्याने चूक केली आणि वेगाने येणारा चेंडू थेट त्याच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या भुवयला लागला. त्यानंतर हॅरिसला वेदना होत होत्या. ज्यामुळे त्याला लगेच मैदान सोडावे लागले. सामन्यानंतर त्याचे एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये त्याच्या डोक्यावर पट्टी बांधलेली दिसते. रिपोर्ट्सनुसार तो आता बरा आहे.

अशी अनेक उदाहरणे आहेत, जेव्हा तरुण खेळाडूंनी दुखापतीमुळे खेळाला अलविदा करावा लागला. अशा परिस्थितीत हॅरिसच्या प्रसंगातून युवा खेळाडूंनी धडा घ्यायला हवा. खेळादरम्यान हेल्मेटसारखी इतर उपकरणे वापरावी लागतात हे तरुणांनी शिकले पाहिजे. या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, खैबर पख्तूनख्वाने मध्य पंजाबसमोर १४४ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे पंजाब संघाने केवळ २७ षटकांत २ गडी गमावून पूर्ण केले. हॅरिस ५ चेंडूत १ धाव काढून बाद झाला.

हेही वाचा – Karun Nair Tweet: पाच वर्षांपासून संधी न मिळाल्याने नायरने व्यक्त केली खंत; आता ट्विट होत आहे व्हायरल

विशेष म्हणजे २१ वर्षीय मोहम्मद हॅरिस पाकिस्तानच्या जर्सीत दिसला आहे. हॅरिस हा आक्रमक फलंदाज असून त्याने पाकिस्तानसाठी आतापर्यंत ४ वनडे आणि ५ टी-२० सामने खेळले आहेत. टी-२० विश्वचषकात हॅरिसने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ११ चेंडूत २८ धावांची तुफानी खेळी केली होती. टी-२० फॉरमॅटमध्ये त्याचा स्ट्राइक रेट १३८.६६ आहे. त्याची लिस्ट ए मध्ये सरासरी ३०.५०आहे.

Story img Loader