Shubman Gill Says I Am Indian Spider Man: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात डब्ल्यूटीसीचा फायनल सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला ७ जूनपासून इंग्लमध्ये सुरुवात होईल. या सामन्यात भारतीय संघाच्या युवा सलामीवीर शुबमन गिल सर्वांच्या नजरा असणार आहेत. कारण आयपीएलच्या सोळाव्या हंगामात त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. अशात सोशल मीडियावर शुबमन गिलचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शुबमन गिल सोशल मीडिया इन्फ्लुएंसर निहारिका एनएमशी बोलत आहे. निहारिका एनएम आणि शुबमन गिल अनेक मनोरंजक विषयांवर बोलताना दिसत आहेत.
निहारिका आणि शुबमनचा व्हिडीओ व्हायरल –
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, जेव्हा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर निहारिका एनएम शुबमन गिलला विचारते, तुला कोणता खेळ आवडतो? या प्रश्नाच्या उत्तरात शुबमन गिल म्हणतो की, मी क्रिकेट खेळतो. यानंतर जेव्हा शुबमन गिल निहारिका एनएमला विचारतो की, तुला चित्रपट पाहायला आवडतात का? तर निहारिका एनएम सांगते की, मला चित्रपट पाहायला आवडतात. अशा प्रकारे दोघांमध्ये संभाषण सुरू होते… तसेच निहारिका एनएम पुढे म्हणते की, मला सुपरहिरोसारखे चित्रपट खूप आवडतात.
मी भारतीय स्पायडर मॅन आहे – शुबमन
यानंतर शुबमन गिल म्हणतो की, ‘मी भारतीय स्पायडर मॅन आहे.’ तेव्हा निहारिका एनएम म्हणते की मला तुला काही सांगायचे आहे… मी प्रियांका चोप्रा आहे. निहारिका एनएम पुढे म्हणते की, मला स्पायडर मॅन चित्रपट खूप आवडतो, कारण या चित्रपटात अनेक चढ-उतार आहेत. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.
शुबमन गिल आयपीएल २०२३ च्या हंगामाचा ऑरेंज कॅप विजेता राहिला आहे. या खेळाडूने आयपीएल २०२३च्या हंगामात सर्वाधिक धावा केल्या. शुबमन गिलने १७ सामन्यात ५९.३३च्या सरासरीने ८९० धावा केल्या. तसेच, त्याने तिनदा शतक झळकावण्याचा पराक्रम केला. त्याचबरोबर आता तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या डब्ल्यूटीसी फायनल सामन्याठी टीम इंडियाचा भाग आहे.