भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. धनश्री एक कोरिओग्राफर आहे. ती इन्स्टाग्रामवर तिचे डान्स व्हिडिओ शेअर करत असते. यावेळी धनश्री सोशल मीडियावर पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसली आहे. यावेळी धनश्री तिच्या कोणत्याही डान्स मूव्हमध्ये नाही, तर बॅटसह क्रिकेट शॉट खेळताना दिसली आहे.
धनश्री वर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धनश्रीच्या हातात बॅट असून ती काही शॉट्स खेळताना दिसत आहे. या शॉट्स दरम्यान ती चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (एमएस धोनी) याचा ट्रेडमार्क ‘हेलिकॉप्टर शॉट’ खेळताना दिसत आहे. याशिवाय तिने स्क्वेअर कट, स्ट्रेट ड्राईव्ह, हुक शॉट, स्वीप शॉटसह अनेक प्रकारचे शॉट्सही खेळून दाखवले आहेत.
हेही वाचा – किती सांगू मी सांगू कुणाला..! वाईट काळात विराटला मिळाली ‘आनंदाची’ बातमी; वाचा नक्की घडलं काय?
धनश्रीच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भिन्न भिन्न प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने तिला ”आधी बॅट नीट पकड”, असेही म्हटले. धनश्री हा सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा असून ती अनेकदा अनेक जाहिरातींमध्ये पाहायला मिळते. गेल्या आठवड्यात तिचा ‘प्यार चाहिये’ हा नवीन व्हिडिओ चर्चेत आला होता.
दरम्यान, धनश्रीचा पती यजुर्वेंद्र चहलला आयपीएल २०२२ मध्ये आरसीबीने (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) कायम ठेवले नाही. तो आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात प्रवेश करेल. लेग-स्पिनरने आयपीएल २०२१ मध्ये १८ विकेट घेतल्या.