आयपीएलचा बारावा हंगाम सुरु होण्याआधीच टीम इंडियातल्या प्रमुख खेळाडूंमध्ये सोशल मीडियावर चांगलीच जुंपलेली दिसत आहे. टीम इंडियाचे सहकारी असलेले हे सर्व खेळाडू आयपीएलमध्ये विविध संघाकडून खेळत असतात. Star Sports वाहिनीने यंदाच्या हंगामात प्रत्येक संघातील महत्वाच्या खेळाडूंना सोबत घेऊन एक जाहीरातीचं कँपेन केलं. यामध्ये मुंबई इंडियन्सचा महत्वाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला आव्हान दिलं आहे. “मी अजून जगातला सर्वोत्तम गोलंदाज नाहीये, अजुन मला सर्वोत्तम फलंदाजाच्या यष्ट्या उडवायच्या आहेत. विराट भाऊ आतातर आपण दोघं एका संघातही नाहीयोत.”
The World's Best Bowler vs The World's Best Batsman. Who will come out winning? @mipaltan's @Jaspritbumrah93 or @RCBTweets's @imVkohli – Bring it on #VIVOIPL pic.twitter.com/wFVN9cgptD
— IndianPremierLeague (@IPL) February 24, 2019
बुमराहच्या या आव्हानाला कोहलीनेही तितकच धडाकेबाज प्रत्युत्तर दिलं आहे.
The @RCBTweets Captain has a befitting response to the @Jaspritbumrah93 yorkers
Check it out #VIVOIPL pic.twitter.com/m9iEHq0gge
— IndianPremierLeague (@IPL) February 28, 2019
आयपीएलच्या बाराव्या हंगामात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जशी रंगणार आहे. यानंतर बंगळुरु आणि मुंबईचे संघ जेव्हा समोरासमोर येतील तेव्हा बुमराह कोहलीच्या यष्ट्या उडवण्यात यशस्वी ठरतोय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.