ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव २३५ धावांमध्ये संपुष्टात आणला. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने पहिल्या डावात १५ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने ७ गड्यांच्या मोबदल्यात १९१ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी पावसाने व्यत्यय आणल्यानंतरही भारताने उर्वरित फलंदाजांना झटपट माघारी धाडत सामन्यात आपला वरचष्मा कायम राखला. भारताकडून रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. तिसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षणादरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहली हा थोडासा निवांत दिसला. स्लिपमध्ये उभा असनाता विराटने मैदानात सुरु असलेल्या संगीताच्या तालावर ठेका धरला. त्याच्या या नृत्याचा व्हिडीओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शेअर केला असून, सोशल मीडियावर विराटच्या या निराळ्या अंदाजाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

Story img Loader