जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचचे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पहिले विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न पुन्हा भंगले. स्टॅनिसलॉस वॉवरिन्का या स्विस खेळाडूने त्याच्यावर ४-६, ६-४, ६-३, ६-४ असा विजय मिळवत प्रथमच ही स्पर्धा जिंकली.
अतिशय उत्कंठापूर्ण झालेल्या या लढतीत वॉवरिन्काने पहिला सेट गमावल्यानंतर सव्र्हिस व परतीचे फटके यावर सुरेख नियंत्रण मिळवत विजयश्री खेचून आणली. ग्रँड स्लॅम स्पर्धेत त्याचे हे दुसरे विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने २०१४मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले होते. जोकोव्हिचने कारकिर्दीत आतापर्यंत आठ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत, मात्र फ्रेंच स्पर्धेत याआधी दोन वेळा अंतिम फेरीत स्थान मिळूनही अजिंक्यपदापासून तो वंचित राहिला होता.
जोकोव्हिचने अंतिम फेरीत स्थान मिळवण्यापूवी राफेल नदाल व अँडी मरे या तुल्यबळ खेळाडूंवर मात केली होती, तर वॉवरिन्काने माजी विजेत्या रॉजर फेडररला हरवले होते. त्यामुळेच अंतिम सामन्याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. जोकोव्हिचने पहिल्या सेटमध्ये सातव्या गेमच्या वेळी सव्र्हिस ब्रेक मिळवला. तेथून त्याने स्वत:ची सव्र्हिस टिकवत हा सेट जिंकला. त्याने या सेटमध्ये फोरहँडच्या फटक्यांचा सुरेख खेळ केला. दुसऱ्या सेटमध्ये वॉवरिन्काला सूर गवसला. त्याने बॅकहँड व्हॉलिज तसेच कॉर्नरजवळ कल्पकतेने फटके मारत जोकोव्हिचला नामोहरम केले. त्याने दहाव्या गेममध्ये परतीच्या खणखणीत फटक्यांचा उपयोग केला. हा सव्र्हिसब्रेक मिळवताना त्याने हा सेट घेतला व सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये सहाव्या गेमच्या वेळी पुन्हा वॉवरिन्कने सव्र्हिसब्रेक मिळवला व ४-२ अशी आघाडी घेतली. तेथून त्याने खेळावर नियंत्रण राखून हा सेट ६-३ असा जिंकला.
सामन्यात १-२ अशा पिछाडीवर पडल्यामुळे जोकोव्हिचवर कमालीचे दडपण आले होते. तरीही त्याने व्हॉलिजचा झकास खेळ केला. त्याने सव्र्हिसब्रेक मिळवत ३-० अशी आघाडी घेतली होती, मात्र नंतर त्याने केलेल्या अक्षम्य चुकांचा फायदा वॉवरिन्काला मिळाला. वॉवरिन्काने प्लेसिंगचा कल्पकतेने उपयोग केला, तसेच त्याने कॉर्नरजवळ खणखणीत फटके मारून जोकोव्हिचला निष्प्रभ केले. आठव्या गेमच्या वेळी जोकोव्हिचला तीन ब्रेक पॉइंट मिळाले होते, मात्र त्याचा फायदा घेण्यात त्याला अपयश आले. दहाव्या गेममध्ये वॉवरिन्कला पहिला मॅच पॉईन्टचा फायदा घेता आला नाही. मात्र दुसऱ्या मॅच पॉइंटचा फायदा घेत त्याने सुरेख व्हॉली टाकीत जोकोव्हिचला निरुत्तर केले व हा सेट घेत विजेतेपदावर मोहोर उमटवली.
ग्रँड स्लॅम
२०१४ ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा २०१५ फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा
०२
स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने २०१४मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेत जेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्याने रविवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेचे जेतेपद पटकावून कारकिर्दीतले दुसरे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.
०३
नोव्हाक जोकोव्हिचचा गेल्या चार वर्षांतील फ्रेंच ओपन स्पध्रेच्या अंतिम फेरीतील हा तिसरा पराभव आहे.
या विजयावर विश्वास ठेवणे कठीण आहे, परंतु मी बाजी मारली. माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय सामना होता. नोव्हाकने दिलेल्या आव्हानाला सलाम.
– स्टॅनिसलॉस वॉवरिन्का
महिला एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागणाऱ्या ल्युसी साफारोव्हाने दुहेरीत जेतेपदाला गवसणी घालताना पहिले ग्रँड स्लॅम जिंकेले महिला दुहेरीत बी. मॅटेक सँड आणि साफारोव्हा यांनी बाजी मारली. सँड-साफारोव्हा या ७ व्या मानांकित जोडीने पहिला सेट गमावल्यानंतरही या जोडीने दमदार खेळाचा नजराणा सादर केला. या दोघींनी आक्रमक खेळ करताना कॅसी डेल्लाक्युआ आणि यारोस्लावा श्वेदोव्हा यांच्यावर ३-६, ६-४, ६-२ असा विजय मिळवला.