बॉक्सिंगमधील ‘सुपर मॉम’ म्हणून नावलौकिक मिळविलेल्या एम.सी.मेरी कोमने आजपर्यंत जागतिक स्पर्धेत वर्चस्व गाजवले आहे. मात्र यंदाच्या स्पर्धेत पदक मिळवण्याचा मार्ग खडतर असल्याचे तिने सांगितले.

भारताच्या राष्ट्रीय महासंघाच्या अभावी येथील स्पर्धेत पंच किंवा तांत्रिक अधिकारी मंडळात कोणीही भारतीय व्यक्ती नसणार आहे. माझ्यासाठी तो मोठा तोटा आहे. मी जरी सर्वोत्तम कौशल्य दाखविले तरी माझी पाठराखण करणारा कोणीही नसल्यामुळे ऑलिम्पिक तिकीट निश्चित करणे अवघड आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी कोणीही नाही, हेदेखील माझ्यासाठी नुकसानकारकच आहे. जर तुमचा महासंघ असेल, तर एखाद्या निर्णयाबाबत आक्षेप घेणे सोपे जाते.’’

‘‘भारतीय बॉक्सिंग क्षेत्रासाठी हा खडतर कालावधी आहे. आतापर्यंत केवळ शिवा थापा हा एकच खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. यावरूनच आपल्या देशातील बॉक्सिंगची अवस्था काय आहे, हे दिसून येते. पुरुषांकरिता केवळ एकच ऑलिम्पिक प्रवेशिका मिळवण्याची संधी बाकी आहे. गतवेळी माझ्यासह आठ भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते,’’ असे मेरी कोमने सांगितले.

ती पुढे म्हणाली, ‘‘यंदा माझ्यापुढे युवा खेळाडूंचे आव्हान असणार आहे. त्यांच्या तुलनेत मी वयाने जास्त आहे. त्यामुळे मी अचूकतेवर भर देणार आहे. मी सुवर्णपदकाचेच ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. खेळाच्या प्राथमिक तंत्रात कोणताही बदल झालेला नाही.

Story img Loader