IND vs PAK, World Cup 2023 Scheduled: विश्वचषक २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. याआधी या सामन्याची तारीख १५ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली होती, मात्र नंतर त्यात पुन्हा बदल करण्यात आला. भारत-पाकिस्तान सामन्याव्यतिरिक्त ८ सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आयसीसीच्या नव्या वेळापत्रकानुसार इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यातील सामना १० ऑक्टोबरला होणार आहे. त्याचवेळी १० ऑक्टोबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामनाही होणार आहे. इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यातील सामना सकाळी १०.३० वाजता सुरू होईल. तर पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात दुपारी २ वाजल्यापासून सामना होणार आहे.

आयसीसीने ‘या’ नऊ सामन्यांचे तारीख बदलली

त्याच वेळी, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना १२ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून खेळवला जाईल. तर न्यूझीलंड आणि बांगलादेशचे संघ १३ ऑक्टोबरला आमनेसामने असतील. उभय संघांमधील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरू होईल.अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १४ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान संघ आमनेसामने असतील. हा सामना दुपारी २ वाजल्यापासून होणार आहे. तर इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात १५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून सामना होणार आहे.

Today is the shortest day and longest night of the year
आज वर्षातील सर्वात लहान दिवस व सर्वात मोठी रात्र, जाणून घ्या नेमकं असं का?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
zee marathi three serial time slot change
२३ डिसेंबरपासून ‘झी मराठी’वर होणार मोठा बदल! ३ मालिकांच्या वेळा बदलल्या, ‘ही’ सिरीयल होणार बंद, तर नवीन मालिका…
Weekly Horoscope 16 To 22 December 2024: या आठवड्यात ६ राशींना मिळणार चांगली बातमी, अचानक धनलाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य
IND vs AUS Gabba Test Start Time Changes for Last 4 Days Announces BCCI
IND vs AUS: गाबा कसोटीच्या अखेरच्या ४ दिवसांची वेळ बदलली, सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या
IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
upsc released announced annual time table
‘यूपीएससी’कडून विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार?

भारत-नेदरलँड सामन्याच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे

ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात ११ नोव्हेंबरला सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी १०.३० वाजल्यापासून ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचा सामना रंगणार आहे. या दिवशी म्हणजेच ११ नोव्हेंबरला इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. हा सामना दुपारी २ वाजल्यापासून होणार आहे. त्याचबरोबर १२ नोव्हेंबरला भारतीय संघासमोर नेदरलँड्सचे आव्हान असणार आहे. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजल्यापासून खेळवला जाईल.

हेही वाचा: Irfan Pathan: “अवघड तुम्ही करा, सोपं काम…”, तिलक वर्माच्या अर्धशतकावरून इरफान पठाण भडकला

नवरात्रीच्या करणास्तव वर्ल्डकप वेळापत्रकात करण्यात आला बदल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा महान सामना आता एक दिवस आधी म्हणजेच १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. याशिवाय वर्ल्ड कपच्या वेळापत्रकात आणखी काही बदल आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त हा सर्व बदल करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस १५ ऑक्टोबरला येत आहे. त्यादिवशी संपूर्ण गुजरातमध्ये गरबा नाइट्सचे कार्यक्रम असतात त्यामुळे सुरक्षा एजन्सी यांनी आधीच बीसीसीआयला सामन्यात बदल करण्याची विनंती केली होती. एवढी सुरक्षा पुरवण्यात काही अडचणी येत असल्याने आता त्यात बदल करण्यात आला आहे.

भारतीय सामन्यांच्या वेळा:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया८ ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगानिस्तान११ ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान१४ ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांग्लादेश१९ ऑक्टोबर, पुणे</td>
भारत विरुद्ध न्यूझीलंड२२ ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड२९ ऑक्टोबर, लखनऊ
भारत विरुद्ध श्रीलंका२ नोव्हेंबर, मुंबई</td>
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका५ नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध नेदरलँड्स११ नोव्हेंबर, बंगळूरू

Story img Loader