Wasim Akram on World Cup 2023 schedule: पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने आयसीसी विश्वचषक २०२३च्या वेळापत्रकावर सूचक विधान केले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चेन्नई, अहमदाबाद आणि बंगळूरू या ठिकाणी खेळू इच्छित नव्हते. मात्र, मंगळवारी जेव्हा आयसीसीने एकदिवसीय विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर केले तेव्हा हे निश्चित झाले की पाकिस्तान १५ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये, ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० ऑक्टोबरला बंगळुरूमध्ये आणि २३ ऑक्टोबरला चेन्नईमध्ये अफगाणिस्तानशी खेळेल.

दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने पीसीबीला घरचा आहेर दिला आहे. तो म्हणाला की, “पाकिस्तानी खेळाडूंना कुठेही खेळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. ते आवश्यक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी वेळापत्रकानुसार खेळतील.” अकरम यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले की, “कोणतीही समस्या नाही. तुम्हाला कुठेही सामना खेळायचा आहे, चर्चा संपली. हे सर्व अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे. जर तुम्ही पाकिस्तानी खेळाडूंना विचारले तर ते म्हणतील की त्यांना अहमदाबाद असो की इतर कुठेही काही फरक पडत नाही, ते वेळापत्रकानुसार खेळतील.”

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
IND vs AUS Travis Head Reveals Discussion with Mohammed Siraj About Their Fight in 2nd test Watch Video
VIDEO: सिराज आणि हेडमध्ये नेमकं काय बोलणं झालं? सिराजने भांडण मिटवलं का? त्यावर हेड काय म्हणाला?
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Rohit Sharma Statement on Mohammed Siraj and Travis Head Fight in IND vs AUS 2nd Test
IND vs AUS: “मर्यादा ओलांडायला नको…”, रोहित शर्माने सिराज-हेडच्या वादात भारतीय गोलंदाजाची घेतली बाजू, सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य
Mohammed Siraj Statement on Travis Head Sendoff Incident Said Its a lie that he said well bowled to me
Siraj on Travis Head Fight: “हेडने सांगितलं ते खोटं आहे…”, मोहम्मद सिराजचं ट्रॅव्हिस हेडच्या वादावर मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?
Travis Head Statement on Mohammed Siraj Fight and Send Off Said I Said Well Bowled IND vs AUS 2nd Test
Travis Head on Siraj Fight: “मी म्हणालो चांगला चेंडू होता पण त्याने…”, सिराज आणि हेडमध्ये नेमका कशावरून झाला वाद? ट्रॅव्हिस हेडने सामन्यानंतर सांगितलं

हेही वाचा: K. Shrikant: “तो जर असता तर टीम इंडिया चॅम्पियन…”, माजी सलामीवीर श्रीकांत यांनी भारताच्या ‘या’ खेळाडूची काढली आठवण

वसीम अक्रम पुढे म्हणाला की, “जर ही अहंकाराची बाब असेल आणि जे काही होत आहे ते चुकीचे आहे असे तुम्हाला वाटत असेल तर त्याबद्दल बोला. पण, यापलीकडे जाण्याची गरज आहे. तुम्ही बोलू तिथे आम्ही खेळू पण असा आडमुठेपणा पाकिस्तानला शोभत नाही. पाकिस्तानने आधी योजना तयार करायला हवी, त्यावर अंमलबजावणी कशी करता येईल याचा विचार करावा. जर आम्ही हे करू शकलो नाही तर संपूर्ण जगात पाकिस्तानची नाचक्की होईल. आपण आपल्या देशासाठी देशभक्त आहोत, हे ठीक आहे पण तो आपल्या देशासाठी घातक आहे का? यावर एकदा करावा. बाकी पाकिस्तान वर्ल्डकप विजयाचा दावेदार आहे यात शंका नाही पण शेवटी हा फक्त एक खेळ आहे.”

क्रिकेट विश्वचषक २०२३चे वेळापत्रक समोर आल्यानंतर, पीसीबीने स्पष्ट केले की, “वन डे विश्वचषकातील आपला सहभाग सरकारच्या निर्णयावर अवलंबून असेल.” पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “विश्वचषक स्पर्धेतील आमचा सहभाग आणि आम्ही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलो की, १५ऑक्टोबरला अहमदाबाद किंवा मुंबई येथे खेळायचे हे सर्व सरकारच्या मंजुरीवर अवलंबून असेल.” आयसीसीने मात्र हे स्पष्ट केले आहे की, “पाकिस्तानचा ICCशी एक करार केला असल्याने त्यांना अशा अटी ठेवता येणार नाही. त्यामुळे क्रिकेटच्या मूळ संस्थेने त्यांना विश्वचषकाचा भाग बनवण्याची अपेक्षा केली आहे.”

हेही वाचा: Ashes 2023: लॉर्डस कसोटीत हंगामा; आंदोलनकर्त्या व्यक्तीला जॉनी बेअरस्टोने डायरेक्ट उचलून मैदानाबाहेर नेले, Video व्हायरल

पाकिस्तान उपांत्य फेरी गाठू शकतो

अक्रमने यापूर्वी आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, “पाकिस्तान संघ २०२३च्या क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकेल असे मला वाटते.” भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना रविवार, १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

Story img Loader