ODI World Cup 2023 IND vs PAK: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा मंगळवारी (२७ जून) करण्यात आली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ५ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्याचवेळी या मैदानावर १९ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यांचे यजमानपद मुंबई आणि कोलकाता यांना देण्यात आले आहे. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की जर भारत उपांत्य फेरीत पोहोचला तर तो कोणत्या मैदानावर खेळेल का?

आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांच्या मते, पहिला उपांत्य फेरीचा सामना १५ नोव्हेंबर रोजी गुणतालिकेत पहिल्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये खेळवला जाईल. त्याच वेळी, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेले संघ १६ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळतील. यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या संघांसाठीही काही अपवाद ठेवण्यात आले आहेत. मात्र, हे कोडं अनेक क्रिकेट चाहत्यांना हे समजले नाही.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी अन्य देशात हलवल्यास पाकिस्तान बोर्डाला कोट्यवधींचा फटका; कसा ते जाणून घ्या
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी

भारतीय संघाला कोलकाता दौऱ्यावर जावे लागू शकते

जर भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला तर त्यांचा सामना मुंबईत होईल. टीम इंडिया कोणत्याही क्रमाने पहिल्या चारमध्ये राहिल्यास त्याचा काहीही परिणाम होणार नाही. मात्र, पाकिस्तानविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना झाल्यास भारतीय संघाला कोलकात्याला जावे लागेल. आयसीसीच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान संघ आपला उपांत्य फेरीचा सामना कोणत्याही परिस्थितीत कोलकातामध्ये खेळेल.

पाकिस्तानचा संघ कोलकात्यातच सेमीफायनल का खेळणार?

वास्तविक, राजकीय कारणांमुळे पाकिस्तानचा संघ मुंबईत खेळणार नाही. त्यांच्या संघाला मुंबईत खेळू न देण्यासाठी काही राजकीय पक्ष वर्षानुवर्षे विरोध करत आहेत त्यात त्यांनी नाव न घेता शिवसेना आणि मनसेकडे इशारा केला आहे. पीसीबीला कोणत्याही प्रकारचा वाद ओढवून धोका पत्करायचा नाहीये. साखळी फेरीतही त्यांचे जवळपास सर्व सामने दक्षिण भारतातच खेळणार आहेत. पाकिस्तानने हैदराबादमध्ये दोन, बंगळुरूमध्ये दोन आणि चेन्नईमध्ये दोन सामने खेळेल. पाकिस्तानी संघ कोलकातामध्ये दोन सामने खेळणार आहे. त्याचवेळी अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध एकच सामना होणार आहे.

हेही वाचा: Virender Sehwag: धोनी वर्ल्डकप जिंकण्यासाठी खायचा ‘हा’ पदार्थ; सेहवागने केला खुलासा म्हणाला, “संपूर्ण विश्वचषकात…”

पीसीबीने या दोन सामन्यांचे ठिकाण बदलण्याची मागणी केली होती

पीसीबीने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यांचे ठिकाण बदलण्याची मागणी केली होती. पाकिस्तानला २० ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरूमधील चिन्नास्वामी आणि २३ ऑक्टोबरला चेपॉक, चेन्नई येथे अफगाणिस्तानचा सामना खेळायचा आहे. चेन्नईतील परिस्थिती अफगाणिस्तानला अनुकूल होईल, असे पाकिस्तानने वेळापत्रकाच्या मसुद्यावरील पत्रात नमूद केले होते. त्यामुळे स्थळ बदलणे पाकिस्तानसाठी फायदेशीर ठरले असते. मात्र, त्यांची ही मागणी बीसीसीआय आणि आयसीसी यांनी फेटाळून लावली आहे.

पीसीबीला जागा का बदलायची होती?

चेपॉक येथे चेंडू खूप वळण घेतो आणि अफगाणिस्तानमध्ये राशिद खान, मुजीब उर रहमान आणि नूर अहमद यांच्यासह जागतिक दर्जाचे फिरकीपटू आहेत जे पाकिस्तानसाठी मोठा धोका असू शकतात. तर, चिन्नास्वामी स्टेडियम जास्त धावांसाठी ओळखले जाते आणि तिथे कोणत्याही धावसंख्येचा सहज पाठलाग करता येतो. दोन्हीपैकी एकाही सामन्यात ते फेव्हरिट म्हणून मैदानात उतरणार नाहीत, अशी भीती पाकिस्तानला होती. या कारणास्तव त्यांनी स्थळ बदलण्याची मागणी केली होती.

हेही वाचा: WC 2023: वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर होताच पाकिस्तानच्या पोकळ धमक्या सुरु; म्हणाले, “भारतात जाण्याचा निर्णय…”

२०१६ मध्येही पाकिस्तानने अशी मागणी केली होती

२०१६ मध्ये टी२० विश्वचषक खेळण्यासाठी पाकिस्तानने शेवटचा भारत दौरा केला होता. सुरुवातीला ते भारतासोबत धरमशाला येथे खेळणार होते, पण पाकिस्तानच्या विनंतीवरून हा सामना कोलकात्यात हलवण्यात आला.